Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

Shravan Shivaji Thackeray

नवोदय परीक्षेत उत्तीर्ण श्रवण शिवाजी ठाकरे याचा जिल्हा परिषद शाळा धामणी मानोरा येथे सत्कार

Shravan Shivaji Thackeray: नवोदय परीक्षेत पात्र ठरलेला श्रवण शिवाजी ठाकरे यांचा सत्कार समारंभ दिनांक २७ मार्च रोजी जिल्हा परिषद शाळा धामणी मानोरा येथे घेण्यात आला.


नवोदय परीक्षेत उत्तीर्ण श्रवण शिवाजी ठाकरे याचा जिल्हा परिषद शाळा धामणी मानोरा येथे सत्कार

Shravan Shivaji Thackeray |

मानोरा (Shravan Shivaji Thackeray) : नवोदय परीक्षेत पात्र ठरलेला श्रवण शिवाजी ठाकरे (Shravan Shivaji Thackeray) यांचा सत्कार समारंभ दिनांक २७ मार्च रोजी जिल्हा परिषद शाळा धामणी मानोरा येथे घेण्यात आला. या कार्यक्रमात मानोरा पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकारी अनिल पवार साहेब उपस्थित होते. त्यांनी  विद्यार्थ्यांचे कौतुक करून इतर मुलांना अशाच प्रकारे प्रगती करण्यासाठी  संबोधले .तसेच  धामणी गावातील सरपंच सौ दिपाताई अभिजीत पाटील देखील उपस्थित होत्या. त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

शाळेसाठी इतरही सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक  धारपवार,  जाधव उपस्थित होते. त्यांनी जिल्हा परिषद शाळेचे कौतुक केले. शिवाजी लक्ष्मण ठाकरे यांनी शिक्षकांबद्दल त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. लक्ष्मी ठाकरे ,अन्नपूर्णा ठाकरे, त्याच्या कुटुंबातील मंडळीउपस्थित होते कार्यक्रमात कोल्हे ताई ,भाग्यश्री डेरे ,मीना डेरे , रेखा डेरे, अंगणवाडी कर्मचारी वर्ग तसेच तेजस्विनी धोटे, धीरज ठाकरे, विजया कानपुरे .गणेश कानपुरे. वनिता आमटे, पायल बडवे, तायडे काकू यांनी देखील आपली  उपस्थिती दर्शवली. केंद्रप्रमुख श्री काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका  कु.कांचन इंगोले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सूत्रसंचालन कु. सीमा गायकवाड यांनी केले. मुख्याध्यापिका यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. 

Related to this topic: