Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > आपले शहर > मुंबई

ठाणे येथे शिवशाही बसला भीषण आग; CETIS ब्रिज परिसरात खळबळ; १५ प्रवासी सुखरूप

ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सेटीस (CETIS) ब्रिज परिसरात आज दुपारच्या सुमारास शिवशाही बसला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली.


ठाणे येथे शिवशाही बसला भीषण आग cetis ब्रिज परिसरात खळबळ १५ प्रवासी सुखरूप

Shivshahi Bus Incident |

ठाणे (Shivshahi Bus Incident) : ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सेटीस (CETIS) ब्रिज परिसरात आज दुपारच्या सुमारास शिवशाही बसला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. उकाड्यामुळे आधीच त्रस्त असलेल्या प्रवाशांमध्ये या घटनेमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही शिवशाही बस ठाण्याहून पालघरमार्गे बोईसरकडे रवाना होणार होती. बस स्थानकाजवळ आल्यानंतर अचानक बंद पडली. चालकाने परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच बसच्या खालच्या भागातून धूर निघताना दिसला आणि काही क्षणांतच इंजिन व डिझेल टाकीजवळ आग भडकली. आग वेगाने पसरत गेल्याने बसने काही वेळातच पेट घेतला.

​​​​​​​

घटनेच्या वेळी बसमध्ये सुमारे १५ प्रवासी होते. आग लागल्याचे लक्षात येताच सर्व प्रवाशांनी तत्काळ बसमधून बाहेर पडत स्वतःचा बचाव केला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली असून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.

आग लागल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही मिनिटांतच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी पाण्याच्या प्रचंड दाबाने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्यामध्ये सहभाग घेतला. मात्र, आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण बस जळून खाक झाली. आगीची तीव्रता इतकी होती की शेवटी बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला.

प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतूक व प्रवासी हालचालींमध्ये अडथळा निर्माण झाला होता. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Related to this topic: