Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

शिवनाथ नदी उगमस्थान

कोरची तालुक्यातील शिवनाथ नदी उगमस्थानाला 'क' श्रेणी पर्यटन स्थळ घोषित करा!

Shivnath River: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या छत्तीसगड राज्यातील जीवनदायिनी असलेली कोरची तालुक्यातील कोटगुल-गोडरी गावाजवळून उगम पावलेल्या शिवनाथ नदी


कोरची तालुक्यातील शिवनाथ नदी उगमस्थानाला क श्रेणी पर्यटन स्थळ घोषित करा 

Shivnath River |

 

भाजयुमो चे तालुकाध्यक्ष विनोद कोरटी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोरची (Shivnath River) : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या छत्तीसगड राज्यातील जीवनदायिनी असलेली कोरची तालुक्यातील कोटगुल-गोडरी गावाजवळून उगम पावलेल्या शिवनाथ नदीच्या उगमस्थानाला 'क' श्रेणी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजयुमो चे तालुकाध्यक्ष तथा युवा नेते विनोद कोरटी यांनी राज्याचे मुख्यमंत्री व पर्यटन मंत्र्यांकडे ई-मेल निवेदनाद्वारे केली आहे.निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या उगमस्थानी वर्षभर पर्यटकांना आकर्षित करण्याची मोठी क्षमता आहे. मात्र, योग्य नियोजनाअभावी हे विहंगम स्थळ उपेक्षित राहिले आहे. येथे जर 'क' श्रेणी पर्यटन स्थळांतर्गत विविध विकासकामे झाली, तर या परिसराचा कायापालट होऊ शकतो.

 शिवनाथ नदीचा उगम परिसर अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे. या जागेला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यास येथे पर्यटकांच्या सोयीसाठी रस्ते, पिण्याचे पाणी, सुशोभीकरण, आणि निवाऱ्याची व्यवस्था करणे शक्य होईल. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन या परिसराचा आर्थिक व सामाजिक विकास होण्यास मदत होईल व स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल.      

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्याला समृद्ध वनसंपदेचा वारसा लाभला आहे. शिवनाथ नदीच्या उगमस्थानाचा विकास झाल्यास गडचिरोलीसह लगतच्या परिसरातील पर्यटकांना एक उत्तम पिकनिक स्पॉट आणि निसर्ग पर्यटन केंद्र उपलब्ध होईल. या परिसराचे जतन करून त्यास अधिकृत पर्यटन स्थळ बनवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही लावून धरण्यात आली आहे. शासनाकडून या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच निधी मंजूर होईल, अशी अपेक्षा भाजयुमो चे तालुकाध्यक्ष विनोद कोरटी यांनी व्यक्त केली आहे.