Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

शिवाजी महाराज पुतळा विवाद

हिरडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी न घेता बसविल्याने गुन्हे दाखल

Shivaji Maharaj statue controversy: हिरडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगीशिवाय बसवल्याने 19 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.


हिरडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी न घेता बसविल्याने गुन्हे दाखल

Shivaji Maharaj statue controversy |

हिंगोली (Shivaji Maharaj statue controversy) : तालुक्यातील हिरडी येथे ग्रामपंचायत कार्यालय हिरडी व शासनाची कोणतेही परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविल्याने बासंबा पोलीस ठाण्यात १९ जणांवर महाराष्ट्र पुतळ्यांच्या पवित्र भंगाबाबत अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील हिरडी गावातील पाण्याच्या टाकी समोरील सार्वजनिक जागेवर २६ ते २७ मार्च दरम्यानच्या कालावधीत हिरडी ग्रामपंचायत कार्यालय व शासनाची कोणतेही परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला. ही (Shivaji Maharaj statue controversy) बाब ग्रामपंचायत कार्यालयाच्या निदर्शनास आली असता त्यांनी हा पुतळा झाकण्यासाठी सांगुन ही पुतळा झाकला नसल्याने या संदर्भात २७ मार्चला ग्रामपंचायत चे सेवक नामदेव दत्तराव गायकवाड यांनी बासंबा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गजानन पांडुरंग थोरात, संजय पुंजाजी थोरात, पुंजाजी पुंडलिक लांडगे, शिवाजी विश्वनाथ थोरात, कडुजी जाधव, रमेश किशनराव थोरात, शिवाजी लिंबाजी लांडगे, गजानन बापजी लांडगे, विलास प्रकाश थोरात, रामेश्वर अर्जुन काकडे, संतोष काळुराम सोळंके, गणेश गंगाराम काकडे, लक्ष्मण तातेराव थोरात, विठ्ठल भुजग थोरात यासह इतर चार ते पाच जण सर्व रा. हिरडी यांच्यावर महाराष्ट्र पुतळ्यांच्या पवित्र भंगाबाबत अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू पोले हे करीत आहेत.

Related to this topic: