Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

पेट्रोल-डिझेल दरवाढ

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात उद्धव ठाकरे शिवसेनेचे आंदोलन

Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढ, इंधन टंचाई आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व युवासेनेच्या वतीने चिखली येथे आंदोलन करण्यात आले.


पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात उद्धव ठाकरे शिवसेनेचे आंदोलन

Petrol-Diesel Price Hike |

 

महागाई, इंधन टंचाई आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात चिखलीत घोषणाबाजी

चिखली (Petrol-Diesel Price Hike) : पेट्रोल-डिझेल दरवाढ, इंधन टंचाई आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व युवासेनेच्या वतीने चिखली येथे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. युवासेना शहर प्रमुख आनंद गैची यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान नागरिक व वाहनधारकांना ‘Melody’ चॉकलेट वाटून प्रतीकात्मक निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी देशातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि वाहनधारक महागाई व (Petrol-Diesel Price Hike) इंधन टंचाईमुळे त्रस्त असल्याचे सांगत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. डिझेल तुटवड्यामुळे वाहनधारकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंप परिसरात जाऊन नागरिकांशी संवाद साधला तसेच इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. सरकारने पेट्रोल-डिझेल दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात युवासेना जिल्हाप्रमुख नंदु कर्‍हाडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलासराव सुरडकर, तालुका प्रमुख श्रीकिसन धोंडगे, शहरप्रमुख श्रीरामभाऊ झोरे, शहर संघटक प्रितमभाई गैची यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच युवासेना उपजिल्हाप्रमुख अशोक राजपूत, तालुका संघटन विष्णू मुरकुटे, उपतालुका प्रमुख सुनील रगड, वंसंतराव आंभोरे, उपशहरप्रमुख समाधान जाधव, शंभु गाडेकर, अनिल जावरे, गणेश कुडके, बंटी कपूर, राहुल वरवंडे, पुंजाजी शेळके, पिंटू गायकवाड, सतनामसिंग वधवा, दीपक सोलाट, किशोर माहले, साजिद भाई, सचिन जोशी, शोहेल शाह, देविदास लोखंडे, रामदास पाटील, गजुभाऊ सांखरे, दीपक जाधव, उमेश झोरे, दिनेश गैची, प्रथमेश गैची, इमरान शेख, इमरान भाई यांच्यासह अनेक शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.