Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

Shiv Sena

विविध संघटना व पक्ष पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

उदगीर विधानसभा मतदारसंघातील विविध संघटना व विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.


विविध संघटना व पक्ष पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Shiv Sena |

लातूर : उदगीर विधानसभा मतदारसंघातील विविध संघटना व विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी शनिवारी माजी आमदार सुधाकर भालेराव व जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास ठेवून तसेच शिवसेना सचिव संजय मोरे आणि लोकसभा संपर्कप्रमुख आमदार मंगेश कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या नेतृत्वात व जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी अतुल काकडे (संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष), देवा घंटे (मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष) तसेच त्यांच्या टीममधील शेरूभाई शेख, अमोल मोरे, रावसाहेब कुंडगीर, सचिन सूर्यवंशी, ज्ञानेश्वर बिरादार, मनोज कांबळे, गो. शेख खाजा शेख, श्रीधर जाधव, जावेद कादरी, विष्णू जाधव, मेहबूब सय्यद, शंकर दंडे, शरद मोरे, मोहनेश्वर विश्वकर्मा, आमीर हाश्मी, शाकर शेख, जमीर पठाण, जोब शेख, कौसर ऋषी रोडेवाड, मोहम्मद इलियास आदी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख संदीप कुलकर्णी, अनिल पंचाक्षरी, वि.स. प्रमुख (BLA-1), तालुकाप्रमुख मनोज पाटील, शहरप्रमुख अमेर शेख, लखन कांबळे, विधानसभा समन्वयक माधव टेपाले, सुखदेव गुंमणर, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष, ओबीसी जिल्हाध्यक्ष विलास राठोड, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जावेद बागवान, सतीश कांबळे, प्रशांत भालेराव तसेच महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: