Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

शिंदे गट बैठक

शिंदे गटातील आढावा बैठकीत भावनाताई गवळी आणि डॉ. राजन साळवी यांच्या उपस्थितीत राजकीय 'कलगीतुरा'

Shinde group meeting: रिसोड येथील बैठकीत जिल्हा प्रमुखांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, शिंदे गटात अंतर्गत वाद उघड. वरिष्ठांच्या भूमिकेची प्रतीक्षा.


शिंदे गटातील आढावा बैठकीत भावनाताई गवळी आणि डॉ राजन साळवी यांच्या उपस्थितीत राजकीय कलगीतुरा

Shinde group meeting |

 जिल्हा प्रमुखांच्या कार्यपद्धतीवर पदाधिकारी नाराज?

रिसोड (Shinde group meeting) : शिवसेना नेते तथा माजी खासदार भावनाताई गवळी आणि अकोला लोकसभा संपर्क प्रमुख शिवसेना नेते माजी आमदार डॉ. राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला लोकसभा विधानसभा पदाधिकारी आढाव बैठक रिसोड येथे नुकतीच पार पडली.ही बैठक पदाधिका-यांच्या पदापासुन ते नेतृत्वातील डावला,डावली सारख्या अनेक मुद्यावर चांगलाच कलगीतुरा झाल्याची माहीती प्राप्त आहे.

   वाशिम जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटामध्ये सध्या 'सर्वकाही आलबेल' नसल्याचे चित्र दिसत आहे.जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख,स्थानिक पदाधिकारी यांच्यातील आपशी वर्चस्वा वरून जोरदार 'कलगीतुरा' रंगला असुन,हा वाद आता थेट मुंबईतील वरीष्ठ नेत्यां पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
    प्राप्त  माहिती नुसार, पक्षांतर्गत नियुक्त्या आणि विकास कामांच्या नियोजनामध्ये जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा सुर उमटत आहे. जिल्हा प्रमुखांच्या कार्यपद्धतीवर पक्षांतर्गत काही गट नाराज असून,पक्षात दोन गट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.विशेषतः रिसोड आणि वाशिम विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यां मध्ये समन्वयाचा अभाव दिसुन येत आहे.पक्षाच्या पडत्या काळात सोबत राहिलेल्या शिव सैनिकांना बाजुला करून, सत्तेच्या काळात पक्षात आलेल्यांना झुकते माप दिले जात असल्याचा आरोप होत आहे. गेल्या काही दिवसांत जिल्हा प्रमुखांनी आयोजित केलेल्या महत्त्वाच्या बैठकांना अनेक बड्या पदाधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहुन आपली नाराजी उघडपणे दर्शवली आहे.

आता वरिष्ठांच्या भुमिकेकडे लक्ष..!

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर हा पक्षाअंतर्गत वाद पक्षाला महागात पडू शकतो, अशी भीती सामान्य शिवसैनिकां कडून व्यक्त केली जात आहे. मा.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणात लक्ष घालून जिल्हा कार्यकारिणीत काही बदल करतात की नाराजांची समजुत काढतात,याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.रिसोड हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो,मात्र आढावा बैठकीत झालेला हा प्रकार जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.या वादामुळे शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असुन,वरिष्ठ पातळी वरून काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: