Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

टीईटी विरोध एल्गार

टीईटी विरोधात शिक्षकांचा एल्गार; हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन

TET Exam Elgar: हिंगोलीत, टीईटी विरोधात शिक्षकांनी भव्य धरणे आंदोलन केले. शिक्षक संघटनांनी मुख्यमंत्री व शासनाकडे विविध मागण्या सादर केल्या. आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा.


टीईटी विरोधात शिक्षकांचा एल्गार हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन

TET Exam Elgar |

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

हिंगोली (TET Exam Elgar) : टीईटी (Teacher Eligibility Test) अनिवार्यतेच्या मुद्द्यावरून राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांमध्ये असंतोष वाढत असताना, हिंगोलीत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. २० एप्रिल २०२६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी २ ते ५ या वेळेत भव्य लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना निवेदन पाठवून शिक्षकांनी आपल्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.

आरटीई कायद्यानुसार केंद्र शासनाने प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य केली आहे. मात्र हे कलम अन्यायकारक असल्याचा आरोप करत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने याविरोधात दिल्ली सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. तसेच जंतर-मंतर येथे आंदोलन व संसदेला घेराव घालूनही निवेदन देण्यात आले होते. तरीही याबाबत ठोस निर्णय न झाल्याने शिक्षकांमध्ये नाराजी कायम आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने टीईटी उत्तीर्ण (TET Exam Elgar) होण्यासाठी दोन वर्षांची मुदत दिली असतानाही, राज्यातील जिल्हा परिषदांकडून विविध पदांवरील पदोन्नती प्रक्रियेत फक्त टीईटी पात्र शिक्षकांनाच संधी दिली जात असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. यामुळे सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होत असल्याचे सांगत, सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्यावी आणि पदोन्नतीनंतर टीईटी पास करण्यासाठी दोन वर्षांची मुदत द्यावी, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे.

या (TET Exam Elgar) आंदोलनाला प्रहार शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, कास्ट्राईब शिक्षक संघटना, अपग्रेड महासंघ, सेवानिवृत्त शिक्षक संघटना आदी विविध संघटनांचा सक्रीय पाठिंबा लाभला. तसेच जुनी पेन्शन हक्क संघटनेलाही पाठिंब्याचे आवाहन करण्यात आले. टीईटी संदर्भातील प्रकरणे सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात प्रलंबित असताना, प्रशासनाकडून घाईघाईने पदोन्नती प्रक्रिया राबवली जात असल्याने शिक्षकांमध्ये शंका-कुशंका निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात टीईटी व्यतिरिक्तही अनेक प्रलंबित मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये निवड श्रेणी, चट्टोपाध्याय वेतनश्रेणी, वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले, डीसीपीएस धारकांच्या रकमा जीपीएफमध्ये जमा करणे, विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करणे, ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ योजनेचे बक्षीस वितरण आदी मुद्द्यांचा समावेश आहे. आंदोलनस्थळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भेट देत शिक्षकांशी सकारात्मक चर्चा केली व मागण्या शासन दरबारी पाठवण्याचे आश्वासन दिले. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

या (TET Exam Elgar) आंदोलनात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सल्लागार व्ही.एस .सूर्यवंशी , जिल्हाध्यक्ष व्हि. डी. देशमुख, जिल्हाध्यक्ष हरिभाऊ मुटकुळे, कार्याध्यक्ष गजानन खिल्लारी , कोषाध्यक्ष रमेश सूर्यवंशी ,केंद्रप्रमुख संघटना जिल्हाध्यक्ष गजानन बोरकर,प्रहार शिक्षक संघटनेचे किरण राठोड , महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे पंडितराव नागरगोजे ,विजय राठोड , अन्नमवार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे विकास फटांगळे , अंगद साबणे ,जी .डी. कदम , अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जगन्नाथ खराटे , पद्मसिंह जाधव , मधूकर गडदे राहूल खिल्लारे , माधव जाधव , लक्ष्मण वाव्हळ ,श्याम माने ,भगवानराव माखणे , सुरेश पांचाळ , भगवान बेद्रे , पंजाब देवकर , यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आंदोलनाला जोरदार प्रतिसाद दिला. प्रत्यक्ष जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आंदोलन कर्त्याचीं भेट घेऊन निवेदन स्वीकारले व सकारात्मक चर्चा केली. तसेच आसावरी काळे  शिक्षणअधिकारी प्राथमिक , कनिष्ठ प्रशासन अधिकारी दिपक अडागळे , राजेश जावळे यांनी भेट दिली.

Related to this topic: