Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > पुणे

अश्लील फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी चौघांना अटक

अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे.


अश्लील फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी चौघांना अटक

Sexual Assault Case |

राधानगरी तालुक्यातील आरोपींना न्यायालयाची चार दिवसांची पोलिस कोठडी

कोल्हापूर (Sexual Assault Case) : अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुरगूड पोलिसांनी राधानगरी तालुक्यातील चार तरुणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आदित्य बाजीराव शेटके (वय २४, रा. खिंडी व्हरवडे), रणजित संभाजी मुधोळकर (वय २९, रा. सोळांकूर), प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (वय २४, रा. राधानगरी) आणि विक्रम रामचंद्र पाटील (वय २२, रा. बुजवडे) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी आदित्य शेटके याची पीडित तरुणीशी फोटोग्राफी व्यवसायाच्या माध्यमातून ओळख झाली होती. आदित्यच्या मामाचा सोळांकूर येथे फोटोग्राफी आणि व्हिडीओ शूटिंगचा व्यवसाय असून तो व्यवसाय आदित्य सांभाळत होता. याच काळात त्याची तरुणीशी ओळख झाली.

ओळख वाढल्यानंतर आदित्यने ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने तरुणीला मुदाळतिट्टा येथे बोलावले. त्यानंतर मुरगूड तलाव परिसरातील झाडीमध्ये नेऊन तिचे फोटो काढल्याचा आरोप आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने दिली आहे. बदनामीची भीती दाखवून तिचा सातत्याने छळ करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

त्यानंतर आदित्यने पीडितेची ओळख रणजित मुधोळकर याच्याशी करून दिल्याचा आरोप आहे. रणजितनेही फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत गिरगाव, कात्यायनी, कोल्हापूर तसेच पाचगाव परिसरातील विविध लॉजमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची तक्रार आहे. तसेच त्याने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ तयार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

यानंतर आदित्यनेच तरुणीची ओळख प्रणवगिरी पालकर याच्याशी करून दिली. प्रणवगिरीने एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

याचप्रमाणे विक्रम पाटील याच्याशीही तिची ओळख करून देण्यात आली. “तुझे फोटो आणि व्हिडीओ डिलीट करून हे प्रकरण मिटवतो,” असे सांगून त्याने तिला पाचगाव येथील लॉजमध्ये नेले आणि अत्याचार केल्याचा आरोप आहे. पुढे “माझ्याशी लग्न केल्यासच फोटो आणि व्हिडीओ डिलीट करेन,” अशी अट घालत मानसिक छळ केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

पीडितेच्या तक्रारीनुसार, मुरगूड तलाव परिसर, गिरगाव, कात्यायनी तसेच सीबीएस कोल्हापूर परिसरातील विविध ठिकाणी आणि लॉजमध्ये वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तसेच आरोपींनी प्रकरण मिटवून देण्यासाठी पैशांची मागणी केली होती. भीतीपोटी पीडितेने काही आरोपींना रक्कम दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मात्र, पैसे दिल्यानंतरही छळ थांबला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या त्रासामुळे पीडित तरुणी मानसिकदृष्ट्या खचली होती. अखेर धमक्या आणि छळाला कंटाळून तिने मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी चौघा आरोपींना तातडीने अटक केली. या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी मुरगूड पोलिस ठाण्याला भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील करीत आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील आरोप हे पीडितेच्या तक्रारीवर आधारित असून त्याबाबतचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related to this topic: