Breaking News
  • मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
  • पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट, नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!
  • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड
  • नंदुरबारमध्ये 93 लाखांचा 186 किलो गांजा जप्त
  • OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत
  • माकडांमुळे शाळा बंद, विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून पळाले

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

डॉ. हंसराज वैद्य

ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या आता सामाजिक न्याय मंत्रालयाच्या दिल्ली दरबारी: डॉ. हंसराज वैद्य

Dr. Hansraj Vaidya: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नांदेड दौऱ्यादरम्यान ज्येष्ठ नागरिक संघ उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्या


ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या आता सामाजिक न्याय मंत्रालयाच्या दिल्ली दरबारी डॉ हंसराज वैद्य 

Dr. Hansraj Vaidya |

नांदेड (Dr. Hansraj Vaidya) : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नांदेड दौऱ्यादरम्यान ज्येष्ठ नागरिक संघ उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व फेस्कॉमचे उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी केले. यावेळी प्रभाकर कुंटूरकर (सचिव), गिरीश बारहाळे (कोषाध्यक्ष) आणि डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार (महिला विभाग अध्यक्षा) उपस्थित होत्या.

डॉ. वैद्य (Dr. Hansraj Vaidya) यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांकडे केवळ कल्याणकारी दृष्टीने नव्हे, तर सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित केली. जागतिक निकषांनुसार ज्येष्ठ नागरिकांचे वय ६० वर्षे निश्चित करणे, ज्येष्ठ नागरिक कायदा-२००७ व संबंधित नियमांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच सुधारित राष्ट्रीय धोरण तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात "लाडके मायबाप" योजना सुरू करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल, निराधार, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विधवा आणि दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना दरमहा किमान पाच हजार रुपयांचे सन्मानधन देण्याची मागणी करण्यात आली. तसेच सर्व शासकीय योजनांचा लाभ आधार कार्डाच्या आधारे मिळावा, संपूर्ण करमाफी, मोफत सार्वजनिक प्रवास, संपूर्ण आरोग्य कवच, आरोग्य विम्याचा खर्च शासनाने उचलावा, प्रत्येक राज्यात स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कल्याण मंत्रालय व आयोग स्थापन करावा, अशीही मागणी करण्यात आली.
याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक कल्याण भवन, तालुका व गावपातळीवर विरंगुळा केंद्रे उभारणे, तसेच विधान परिषद व राज्यसभेत ज्येष्ठ नागरिकांचे प्रतिनिधित्व निश्चित करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.

"ज्येष्ठत्व हा गुन्हा नसून घटनात्मक भूषण आहे. ज्येष्ठांचा सन्मान म्हणजे राष्ट्राचा सन्मान," असे मत डॉ. हंसराज वैद्य यांनी व्यक्त केले. यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानधनासह सर्व प्रलंबित मागण्यांबाबत सामाजिक न्याय मंत्रालयाच्या स्तरावर गांभीर्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

Related to this topic: