Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

शालेय विद्यार्थी सुरक्षा

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हिंगोलीत व्हॅन-ऑटो चालकांना पोलिसांचा कडक दम

School Student Safety: १८ जून २०२६ रोजी हिंगोली पोलिसांनी शालेच्या व्हॅन, ऑटो चालकांना सखळ्याप्रमाणे परवाना, कागदपत्रे ठेवण्याचे आदेश दिले. मोबाईलवर बोलणे, वेगात गाडी चालविणे


शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हिंगोलीत व्हॅन-ऑटो चालकांना पोलिसांचा कडक दम

School Student Safety |

हिंगोली (School Student Safety) : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी हिंगोली पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. 18 जून 2026 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या अध्यक्षतेखाली शालेय व्हॅन आणि ऑटो चालकांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चालकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. 

पोलीस अधीक्षक डॉ. रोहन यांनी सर्व चालकांना परवाना व गाडीची सर्व कागदपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक केले आहे. तसेच प्रत्येक चालकाने आपला मोबाईल नंबर व फोटो शाळा आणि पालकांना द्यावा, असे आदेश दिले. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, वेगाने गाडी चालवणे आणि (School Student Safety) क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसवणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मुलांना फक्त पालकांकडे किंवा सुरक्षित ठिकाणीच सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

याशिवाय, वाहनातील कोणत्याही बालकासोबत गैरप्रकार घडल्यास किंवा तशी शंका आल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला कळवणे पोक्सो कायदा कलम 19 नुसार बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. बालकांच्या सुरक्षेसाठी (School Student Safety) तत्काळ मदत करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले. या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक कमलेश मिना, दामिनी पथक प्रमुख महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप, प्रो. पोलीस उपअधीक्षक मयुर रसाळ, पोलीस उपअधीक्षक केंद्रे, निरीक्षक शेख यांच्यासह वाहतूक शाखेचे अधिकारी व 50 शालेय व्हॅन, ऑटोचालक उपस्थित होते.