Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

आसोला येथील नवीन शाळा खोलीच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी

तालुक्यातील आसोला येथील नवीन शाळा खोलीचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून, हे काम एका शासकीय कंत्राटदाराच्या नावाखाली एका राजकीय पक्षाच्या तालुका अध्यक्षाने घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.


आसोला येथील नवीन शाळा खोलीच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी

School Construction |

विनोद पाचरणे यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

रिसोड (School Construction) : तालुक्यातील आसोला येथील नवीन शाळा खोलीचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून, हे काम एका शासकीय कंत्राटदाराच्या नावाखाली एका राजकीय पक्षाच्या तालुका अध्यक्षाने घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बांधकामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप करत प्रशासनातील अधिकारी व अभियंते यांचे दुर्लक्ष होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

गावहिताच्या दृष्टीने संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष विनोद पाचरणे यांनी पंचायत समितीकडे या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. आसोला येथील नवीन शाळेचे बांधकाम मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर निकृष्ट काम कोणाच्या नजरेस पडू नये म्हणून संबंधित ठेकेदाराने त्या कामावर तात्काळ रंगरंगोटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

विशेषतः, अपंग व्यक्ती किंवा विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेली रॅम्प अत्यंत चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आली असून, शाळेची बसवलेली चौकटही अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. “अशी चौकट आपण घरातील शौचालयालाही बसवत नाही,” असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या संपूर्ण बांधकामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही विनोद पाचरणे यांनी दिला आहे.

यासंदर्भात त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना रीतसर तक्रार अर्ज सादर केला आहे.

Related to this topic: