Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

School Bus Accident

मोबाईलवर बोलत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले; चाकूरमध्ये स्कूल बस पलटली, २२ विद्यार्थी जखमी

चाकूर तालुक्यातील सांडूळ येथील विद्यार्थ्यांना घेऊन राचन्नावाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाकडे जाणारी एमएच 12 पीक्यू 5120 क्रमांकाची स्कूल बस बुधवारी सकाळी अपघातग्रस्त झाली.


मोबाईलवर बोलत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले चाकूरमध्ये स्कूल बस पलटली २२ विद्यार्थी जखमी

सांडूळ येथून राचन्नावाडीला जाणाऱ्या शालेय बसचा अपघात; सर्व जखमी विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार

चाकूर : चाकूर तालुक्यातील सांडूळ येथील विद्यार्थ्यांना घेऊन राचन्नावाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाकडे जाणारी एमएच 12 पीक्यू 5120 क्रमांकाची स्कूल बस बुधवारी सकाळी अपघातग्रस्त झाली. या अपघातात बसमधील अंदाजे २२ विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना तातडीने चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, एमएच 12 पीक्यू 5120 क्रमांकाची बस चालवत असताना चालक मोबाईलवर बोलत होता. त्याचवेळी मागे वळून पाहिल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याखाली जाऊन पलटी झाली. अपघात होताच बसमधील विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना बसमधून सुरक्षित बाहेर काढून उपचारासाठी चाकूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांवर आवश्यक उपचार केले.

अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनीही रुग्णालयात भेट देत जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली व त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.

या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून, बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related to this topic: