Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > अमरावती

उपवर्गीकरण विरोध मोर्चा

उपवर्गीकरण विरोधात 59 जातींच्या संयुक्त महामोर्चात लाखो नागरिक येणार

Sub-Classification Morcha: उपवर्गीकरण विरोधातील महामोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. या मोरच्यात ५९ अनुसूचित जातींतील लाखो नागरिक सहभागी


उपवर्गीकरण विरोधात 59 जातींच्या संयुक्त महामोर्चात लाखो नागरिक येणार 

Sub-Classification Morcha |

 

पत्रपरिषदेत आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीची माहिती

अमरावती (Sub-Classification Morcha) : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात महाराष्ट्रातील ५९ जातींचा  संयुक्त भव्य   महामोर्चाचे आयोजन  बुधवार(ता. १७)  रोजी सकाळी ११ वाजता  करण्यात आले आहे. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे. या मोर्चात जिल्हाभरातून 59 जातींचे लाखोच्यावर  नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचे प्रा जगदीश गोवर्धन यांनी जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे सोमवार(ता 15) रोजी पत्रपरिषदेतून केला आहे.

राज्य शासनाने अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण लादण्याचा प्रयत्न केल्याचा निषेध या (Sub-Classification Morcha) महामोर्चाद्वारे व्यक्त करण्यात येणार आहे.मोर्चाच्या माध्यमातून  अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल त्वरित सार्वजनिक करावा, शासकीय नोकऱ्यांमधील मागासवर्गीयांचा अनुशेष तातडीने भरावा,

पदोन्नतीतील आरक्षण त्वरित लागू करावे, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, SC, ST व OBC समाजासाठी क्रिमीलेयरची अट लागू करू नये. NEET, CBSE व CUET परीक्षांमधील कथित घोटाळ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी या प्रमुख मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचे रमेश कटके यांनी दिली.

आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, (Sub-Classification Morcha) अमरावती यांच्या वतीने SC, ST, OBC, VJNT आणि DT समाजातील नागरिकांनी लाखोंच्या संख्येने या महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आरक्षण वर्गीकरण विरोधी कृती समितीचे रविकांत गवई यांनी केले आहे. संविधान आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी एकजूट दाखविण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना, कर्मचारी संघटना, युवक संघटना, महिला संघटना, बुद्ध विहार, 59 जातींच्या विविध संघटनांचा मोर्चात सक्रिय सहभाग राहणार असल्याची माहिती समितीचे नयन मोंढे  यांनी दिली.

पत्र परिषदेला आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचे प्रा. जगदीश गोवर्धन, रमेश कटके, रविकांत गवई, नयन मोंढे, विजयकुमार चौरपगार, प्रकाश बोरकर,डॉ.प्रफुल गवई,डॉ.संजय खडसे,डॉ.देविदास आठवले,डॉ. अश्विनी गोडाने, मनीष साठे, सुदाम बोरकर,राजेश वानखडे,सुनील रामटेके, अनिता गवई,मदन गायकवाड उपस्थित होते.