Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

संत गजानन महाराज पालखी

रिसोड बाजार समितीत ३० जूनला संत गजानन महाराज पालखीचा मुक्काम; सोहळा व महाप्रसादासाठी २ लाख ८१ हजार

Saint Gajanan Maharaj Palkhi: श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे दरवर्षीप्रमाणे यंदाही ३० जून रोजी रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आगमन होत असून, पालखीचा मुक्काम येथे असणार आहे.


रिसोड बाजार समितीत ३० जूनला संत गजानन महाराज पालखीचा मुक्काम सोहळा व महाप्रसादासाठी २ लाख ८१ हजार 

Saint Gajanan Maharaj Palkhi |

 

​सभापती विष्णुपंत भुतेकर यांच्या हस्ते निधी सुपूर्द

​रिसोड (Saint Gajanan Maharaj Palkhi) : श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे दरवर्षीप्रमाणे यंदाही ३० जून रोजी रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आगमन होत असून, पालखीचा मुक्काम येथे असणार आहे. या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविक भक्तांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरेदीदार व आडते असोसिएशनच्या वतीने महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या आणि महाप्रसादाच्या खर्चासाठी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने २ लाख ८१ हजार रुपयांचा निधी बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

​शेगाव येथून निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे (Saint Gajanan Maharaj Palkhi) रिसोड शहरात आगमन झाल्यानंतर बाजार समितीच्या आवारात पालखी मुक्कामी विसावणार आहे. या काळात भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि महाप्रसाद सुव्यवस्थित पार पडावा, यासाठी बाजार समिती व व्यापारी असोसिएशनने कंबर कसली आहे.

​निधी वितरणाच्या या प्रसंगी बाजार समितीचे संचालक पुरुषोत्तम तोष्णीवाल, संचालक रवींद्र चोपडे, खरेदीदार असोसिएशनचे अध्यक्ष किशोर कोठळे, खरेदीदार गोपाल काबरा, गोपाल कासट खरेदी विक्री संचालक बाबारावपाटील ढोणे, नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष सदाशिव चौधरी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. ३० जून रोजी होणाऱ्या या पालखी सोहळ्याला आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.