Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

खा. संजय जाधव

सोनपेठात खा. संजय जाधव यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

MP Sanjay Jadhav: सोनपेठ व जिंतूर मध्ये शिवसेनांच्या गटांनी खा. संजय जाधव यांचा छायाचित्राचा प्रतिक्रियासाठी पुढाकार घेतला. गद्दारीची आरोप्यांवर आंदोलन करीत आहे.


सोनपेठात खा संजय जाधव यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

MP Sanjay Jadhav |

 

खासदार निवडूण देल्याचा पश्चाताप १९ जूनला जिंतूरात प्रतिकात्म  जोडे मारो आंदोलन...!

परभणी (MP Sanjay Jadhav) : सोनपेठ येथील शिवसेना उबाठा गटाचे खा. संजय जाधव यांच्या बंडखोरी नंतर सोनपेठ येथे गुरुवार १८ जून रोजी जोडे मारो आंदोलन करत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. सोनपेठ येथील निष्ठावान शिवसैनीकांनी आक्रमक होत आंदोलन केले. 

सोनपेठ येथील शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या कार्यालया बाहेर सकाळपासून शिवसैनीक संतप्त झाल्याचे पहावयास मिळाले. कार्यकर्त्यांनी खा. संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांच्या छायाचित्राला चप्पलांचा हार घालत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. गद्दार संजय जाधव  अशा घोषना देत कार्यकर्त्यांनी मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनला. या ठिकाणी खा.संजय जाधव यांच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेचे दहन करण्यात आले. सोनपेठ येथील शिवसेनीकांनी उध्दव ठाकरेंसोबत असल्याचा निरधार केला.

सोनपेठ येथील आंदोलन शिवसेना विधान सभा प्रमुख माजी आ.कल्याणराव रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. आंदोलनाला शिवसेना उपजिल्हा प्रमुख कृष्णा पिंगळे, तालुका प्रमुख संतोष गवळी, शहर प्रमुख अमोल दहिवाळ, श्रीकृष्ण साठे, रामेश्वर पांडूळे, बाबूल शेख, संजय जाधव, गणेश जोशी, भास्कर भोसले, वैभव यादव, तुकाराम साठे, सिध्देश्वर आव्हाड, गणेश यादव, तेजस भोसले, इम्रान सय्यद, ज्ञानेश्वर परसे, वैभव सुरवसे, गोपाळ भोसले,  फेरोज पठाण, अशोक सुरवसे, सुदर्शन बदाले, रमेश उंडाळकर, महादेव तुपसमींद्रे, गौतम शिंदे, महेश भोसले, विनोद यादव, माऊली िंशदे आदी शिवसैनीकांनी उपस्थिती होती.

जिंतूरात शुक्रवारी आंदोलन  
जिंतूर : खा. संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी पक्षांतर केल्याच्या निषेधार्त जिंतूर शहर व तालुक्यातील काही मतदारांच्या वतीने शुक्रवार १९ जून रोजी तहसील कार्यालया समोर प्रतिकात्मक स्वत: जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे. या बाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. नगर परिषद जिंतूरचे गट नेते तथा काँग्रेस नगर सेवक शेख इसमायल सलीम यांच्या  स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी २ ते ५ यावेळेत सदर अांदोलन करण्यात येणार आहे.