Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Samvad Melava

उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी हिंगोलीत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संवाद मेळाव्यानिमित्त आज, शनिवार (दि. २७ जून) रोजी हिंगोली दौऱ्यावर येणार आहेत.


उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी हिंगोलीत

Samvad Melava |

हिंगोली (Samvad Melava) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संवाद मेळाव्यानिमित्त आज, शनिवार (दि. २७ जून) रोजी हिंगोली दौऱ्यावर येणार आहेत.

संवाद मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. विशेष म्हणजे, शिवसेना (उबाठा) सोडून इतर पक्षात गेलेल्या माजी खासदारांच्या लोकसभा मतदारसंघातही ते दौरे करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात वाशिम येथून झाली असून त्याच अनुषंगाने ते आज हिंगोलीत येत आहेत.

या निमित्ताने हिंगोली शहरातील महावीर भवन येथे सायंकाळी ४ वाजता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला असून, त्यामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, माजी खासदार विनायकराव राऊत, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांची उपस्थिती राहणार आहे.

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे हिंगोली दौऱ्यावर येत असल्याने शिवसेना (उबाठा) पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

दरम्यान, या दौऱ्यानिमित्त नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी कडक पोलीस बंदोबस्ताची तयारी केली आहे. यामध्ये २ उपविभागीय पोलीस अधिकारी, १३ पोलीस निरीक्षक, १३ सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, २५० पोलीस कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक तसेच बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आले आहे. या बंदोबस्ताची शुक्रवारी रंगीत तालीम घेण्यात आली.

Related to this topic: