Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > मराठवाडा > जालना

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकची धडक ; ७ महिला कामगार ठार

जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ७ महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.


समृद्धी महामार्गावर भीषण अपघात भरधाव ट्रकची धडक  ७ महिला कामगार ठार

Samruddhi Expressway Accident |

जालन्यात धक्कादायक दुर्घटना

जालना (Samruddhi Expressway Accident) : जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ७ महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. महामार्गाची सफाई करणाऱ्या महिला कामगारांनी काम आटोपल्यानंतर आपले वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले होते. त्याचवेळी मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने उभ्या वाहनाला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि सात महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या चार जणांना तातडीने जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातातील मृतांमध्ये कडूबाई मदन, ताराबाई चौधरी, लक्ष्मीबाई मदन, अलका आदमाने, मीना आदमाने आणि कांचन आदमाने यांचा समावेश आहे.

महत्त्वाचे म्हणजे, महिनाभरापूर्वीच करमाडजवळ अशाच प्रकारच्या अपघातात तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने तातडीने ठोस सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Related to this topic: