Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

घर शॉर्टसर्किट आग

कुटुंब घरामध्ये झोपलेले असताना शॉर्टसर्किटमुळे लागली आग

House Short Circuit Fire:हिंगोली तालुक्यातील टाकळी येथील सुधाकर रामजी धनवे यांचे कुटुंब झोपत असताना अचानक शॉर्टसर्किटमुळे घरात आग लागल्याने सर्व उपयोगी वसतीसाहित्या मिळालेल्या कटलरीचे सामान जळून


कुटुंब घरामध्ये झोपलेले असताना शॉर्टसर्किटमुळे लागली आग 

House Short Circuit Fire |


हिंगोली तालुक्यातील टाकळी टी एन येथील घटना
संसार उपयोगी साहित्य जळून झाले खाक 

खानापूर चित्ता (House Short Circuit Fire) : एकीकडे मृग नक्षत्र कोरडे जात असल्याने पहिलाच बळीराजा हवालदिल झाला असताना त्यातच शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून घरातील संसार उपयोगी वस्तू, पेरणीसाठी आणलेले बी, बियाणे खतासह पूर्ण घरच आगीने खाक झाल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे.

 हिंगोली तालुक्यातील टाकळी टी एन येथील शेतकरी सुधाकर रामजी धनवे हा तीन एकर शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालून त्याला जोडधंदा म्हणून गावाजवळील खेड्यापाड्याला जाऊन कटलरी विकण्याचा व्यवसाय करीत आपला उदरनिर्वाह हाकत असताना अचानकच शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून पूर्ण घर खाक झाले आहे. वीस जूनच्या रात्री सर्व कुटुंब झोपेत असताना 21 जून लागताच अंदाजे दोन ते दोन तीस च्या दरम्यान  कुटुंब झोपेतच असताना घराला अचानक शॉर्टसर्किटने आग लागल्यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तू, पेरणीसाठी आणलेले बी बियाणे खत यासह कटलरी चा व्यवसाय करण्यासाठी आणलेले अंदाजे 65 ते 70 हजार रुपये किमतीचे  कटलरी सामान लागलेल्या आगीमध्ये खाक झाले आहे.

रात्रीच्या वेळेस अचानक आग लागल्याने सैरावैरा झालेले धनवे कुटुंब झोपेतून उठून रस्त्यावर आले. रस्त्यावर येतात  "आग विझवा आग विझवा " असे म्हणत ओरड केली असता शेजारील असलेल्या नागरिकांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु बघता बघता पूर्ण घराने आग घेतल्याने आग विझवे पर्यंत घरातील पूर्ण साहित्यसह घरच खाक झाले. सदरील घटनेची माहिती महसूल विभागाला दिली असून महसूल विभागाचे महसूल मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी पंचनामा करण्यासाठी येणार असल्याचे धनवे यांनी सांगितले. एकंदरीत धनवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळा असून आज घडीला हे कुटुंब रस्त्यावर आली आहे.