Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

आमदार बळीराम सिरस्कार

स्मशानभूमींच्या दुरवस्थेबाबत माहितीची मागणी; माजी आमदार बळीराम सिरस्कार यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र

MLA Baliram Sirskar: गावातील गैरसुविधांमुळे नागरिकांना अंत्यसंस्कार करण्याची परिस्थिती कठीण झाल्याने बळीराम सिरस्कार यांनी जिल्हाधिकारी, पंचायत समिती आणि ग्रामविकास मंत्रीला चर्चेसाठी निवेदन


स्मशानभूमींच्या दुरवस्थेबाबत माहितीची मागणी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र

MLA Baliram Sirskar |

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोबतही चर्चा

पातूर (MLA Baliram Sirskar) : बाळापूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात स्मशानभूमींच्या अभावामुळे नागरिकांना अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करत माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी जिल्हा परिषद, अकोलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. ९ जुलै २०२६ रोजी दिलेल्या पत्रात बाळापूर, पातूर व अकोला तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये अद्याप स्मशानभूमी उपलब्ध नसल्याचे, तर काही ठिकाणी उपलब्ध स्मशानभूमी अत्यंत दुरवस्थेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागामार्फत तातडीने माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्या गावांमध्ये अद्याप स्मशानभूमी उपलब्ध नाही, तसेच कोणत्या गावांतील स्मशानभूमी नादुरुस्त अवस्थेत आहेत, याची गावनिहाय यादी सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे. स्मशानभूमी ही ग्रामीण भागातील अत्यावश्यक सुविधा असून, नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने वस्तुनिष्ठ माहिती गोळा करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी व्यक्त केली आहे. या पत्राच्या प्रती पातूर व बाळापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

बाळापूर विधानसभा मतदारसंघातील स्मशानभूमीच्या दुरस्तबाबत माजी आमदार बळीराम सिरस्कार (MLA Baliram Sirskar) यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सोबतही चर्चा करून निवेदन दिले आहे अनेक गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याने नदीकाठी अंत्यसंस्कार करण्याची पाळी ग्रामस्थावर येत आहेत पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्यास अंत्यसंस्कार करणे ग्रामस्थांना कठीण जात असल्याने अनेक गावातील मरणानंतरही यातना कमी होत नसल्याने मतदारसंघात स्मशानभूमी करीता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार बळीराम सिरस्कार (MLA Baliram Sirskar) यांनी केले असल्याचे सांगितले