Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

रोटरी क्लब नांदेड

रोटरी क्लब नांदेडच्या अध्यक्षपदी सुरेशराव अंबुलगेकर यांची निवड

Rotary Club Nanded: रोटरी क्लब नांदेड व रोटरी क्लब नंदीग्राम वर्ष २०२६-२७ या वर्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा आणि संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा रविवार, १२ जुलै रोजी दुपारी १ वाजता मोठ्या उत्साहात पार पडला


रोटरी क्लब नांदेडच्या अध्यक्षपदी सुरेशराव अंबुलगेकर यांची निवड

Rotary Club Nanded |

रोटरी क्लब नांदेड आणि रोटरी क्लब नंदीग्रामच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

​नांदेड (Rotary Club Nanded) : रोटरी क्लब नांदेड व रोटरी क्लब नंदीग्राम वर्ष २०२६-२७ या वर्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा आणि संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा रविवार, १२ जुलै रोजी दुपारी १ वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वप्रथम प्रमुख पाहूणे प्रांतपाल रो. क्षितीज झावरे, सह प्रांतपाल रो. संजय पाटील, रो. शिवशंकर पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून या कार्याक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा आणि विविध जिल्ह्यातून आलेल्या रोटरी क्लबच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.​त्यानंतर वर्ष २०२६-२७ या वर्षाच्या रोटरी क्लब नांदेडच्या नूतन अध्यक्षपदी रो. सुरेश अंबुलगेकर यांची तर सचिव पदी रो. प्रशांत गुर्जर यांची निवड करण्यात आली.

​तर रोटरी क्लब नंदीग्रामच्या नूतन अध्यक्षपदी रो. डाॅ. सुरभी राठोर यांची तर सचिव पदी रो. सुनंदा देवणे यांची निवड करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ नांदेडचे मावळते अध्यक्ष रो. सीए मितेश मालीवाल यांनी नूतन अध्यक्ष रो. सुरेश अंबुलगेकर आणि सचिव रो. प्रशांत गुर्जर यांच्याकडे पदभार सोपवला. तर रोटरी क्लब नंदीग्रामच्या मावळत्या अध्यक्षा स्मिता गंदेवार आणि सचिव रो. डाॅ. रामचंद्र हेंडगे यांनी नूतन अध्यक्ष आणि सचिवाकडे रोटरी क्लब नंदीग्राम चा पदभार सोपवला.

​रोटरी क्लब (Rotary Club Nanded) दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवते त्याच बरोबर सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची नेहमी काळजी घेते विविध प्रकारचे आरोग्य शिबीर राबवून मोफत नागरिकांची आरोग्य तपासणी करत असते. त्यामुळे रोटरी क्लबच्या सदस्यांचे देखील आरोग्य तंदुरूस्त राहावे या उद्देशाने या पदग्रहण सोहळ्यात रोटरी क्लबच्या सदस्यांसाठी वजन, उंची, बाॅडी फॅट टक्केवारी, बाॅडी मास इंडेक्स, व रक्त शर्करा तपासणी या पदग्रहण सोहळ्यात करण्यात आली. यात जवळपास ७० लोकांनी तपासणी करून घेतली. तसेच रोटरी क्लबचे सर्व सदस्ये तंदूरूस्त राहावे यासाठी यापुढे वर्षभर त्यांची विविध आरोग्य तपासणी केली जाणार असल्याची माहिती रो. डाॅ. संजय पतंगे यांनी दिली.

​यावेळी महात्मा फुले हायस्कुल नाईक नगर आणि नारायणराव भालेराव हायस्कुल स्नेह नगर या शाळेना डिजिटल क्लास रूमसाठी एलसीडी टिव्ही देण्यात आली. तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना यावेळी शालेय साहित्यांचे देखील वाटप करण्यात आले. तसेच यावर्षी रोटरी क्लब नांदेड चे काही नव्यांने सदस्य झालेल्या सदस्यांचे पीन देवून स्वागत करण्यात आले.​त्यानंतर नुतन अध्यक्ष सुरेशराव अंबुलगेकर यांनी वर्षाभरात रोटरी क्लब नांदेडच्या माध्यमातून वर्षाभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली तसेच तीन नविन (Rotary Club Nanded) रोटरी क्लब करण्याचे सांगितले तसेच शेतकऱ्यांचा क्लब तयार करणार असल्याचे सांगितले तसेच रोटरी क्लबच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी औजारे बँक तयार करून शेतकऱ्यांना औजारे उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती देखील केली.

तसेच हॅप्पी स्कुल प्रोजक्ट, सरकारी शाळेत स्वच्छता गृह, शाळेत स्वच्छता मोहीम राबविणे, विद्यार्थ्यांना कंम्पोस खत निर्मिती करण्याची माहिती दिली जाणार, युव्हमन मिलिकच प्राजेक्ट, रोटरी आशा कॅन्सर व्हॅन सुरू करणार, डोळ्यांची तपासणी करून चश्मे वाटप करणे, अपंग व्यक्तींना कृत्रीम हात पाय वाटप करण्याचे काम हाती घेतले यासह वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या इतर विविध उपक्रमाची माहिती नवनिवार्चित अध्यक्ष रो. सुरेश अंबुलगेकर यांनी दिली. ​या पदग्रहण सोहळ्याला लातूर, अहमदपूर व नांदेड जिल्ह्यातील विविध रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.