Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हत्ता–तळणी मार्गाचे काम वेगात; पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वाचे उद्दिष्ट

सेनगाव तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा हत्ता ते तळणी या मार्गाच्या कामाला आता वेग आला असून, पावसाळ्यापूर्वी बहुतांश काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट संबंधित कंपनीने ठेवले आहे.


हत्ता–तळणी मार्गाचे काम वेगात पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वाचे उद्दिष्ट

Road Construction |

वाहनधारकांना होणार दिलासा

सेनगाव तालुका (Road Construction) : सेनगाव तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा हत्ता ते तळणी या मार्गाच्या कामाला आता वेग आला असून, पावसाळ्यापूर्वी बहुतांश काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट संबंधित कंपनीने ठेवले आहे. दीड वर्षांपूर्वी या रस्त्याचे उद्घाटन झाल्यानंतर कामाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला संथ गतीने सुरू असलेले काम मागील तीन महिन्यांपासून युद्धपातळीवर सुरू असून, वाहनधारकांसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

सध्या या मार्गावर मॅनेजर, इंजिनिअर आणि सुपरवायझर यांच्या देखरेखीखाली कामाची गुणवत्ता राखत बांधकाम सुरू आहे. रामप्रसाद नगर ते बन या दरम्यान दोपदरी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, बाळूमामाची बोरखडीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे कामही अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. याशिवाय साईड पट्टा व शोल्डर तयार करण्याची कामेही वेगाने सुरू आहेत.

दरम्यान, या मार्गावरील पुलांची बांधकामेही प्रगतीपथावर असून, संपूर्ण रस्ता वाहतुकीस सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. हे काम एका कंपनीमार्फत करण्यात येत असून, लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंपनीने विशेष नियोजन केले आहे.

विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या सोयीचा विचार करून प्रत्येकी एक किलोमीटर अंतरावर तीन ठिकाणी सुमारे ३०० मीटरपर्यंत सिमेंट पाईप टाकून पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शेतीसाठी पाण्याचा निचरा व वाहतूक सुलभ होणार आहे.

रस्त्याचे काम सुरू असतानाही वाहनधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी विविध ठिकाणी सूचनाफलक लावण्यात आले असून, वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून दक्षतेने वाहन चालवावे, असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे.

“आम्ही नागरिकांसाठी दर्जेदार रस्ता उभारण्याचे काम करत आहोत. काम पूर्ण होईपर्यंत वाहनधारकांनी संयम ठेवून सूचनांचे पालन करावे,” असे आवाहन संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

हत्ता–तळणी मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होणार असून, नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Related to this topic: