Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

Road Accident

पातूर-अकोला महामार्गावर भीषण अपघात; युनिकॉर्न चालक गंभीर जखमी, पोलिसांची तत्परता

पातूर-अकोला महामार्गावर मंगळवारी एक भीषण दुचाकी अपघात झाला. अकोल्याहून पातूरच्या दिशेने येणारी युनिकॉर्न मोटरसायकल अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला कोसळली.


पातूर-अकोला महामार्गावर भीषण अपघात युनिकॉर्न चालक गंभीर जखमी पोलिसांची तत्परता

पातूर : पातूर-अकोला महामार्गावर मंगळवारी एक भीषण दुचाकी अपघात झाला. अकोल्याहून पातूरच्या दिशेने येणारी युनिकॉर्न मोटरसायकल अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला कोसळली. या अपघातात मोटरसायकल चालक गंभीररीत्या जखमी झाला आहे.

चालक गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश ब्रह्मदास राठोड (वय अंदाजे, रा. राजनखेड) असे गंभीर जखमी झालेल्या बाईक चालकाचे नाव आहे. अपघात इतका भीषण होता की मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले असून चालक रस्त्यावर फेकला गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली.

पोलीस आणि पत्रकारांची घटनास्थळी धाव

अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तारासिंग राठोड, इस्माईल मुल्ला, पोलीस कॉन्स्टेबल साबे तसेच स्थानिक पत्रकार दुल्हे खान यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांनी वेळेचा अपव्यय न करता जखमी चालकाला तात्काळ रुग्णवाहिकेतून (ॲम्ब्युलन्स) अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले.

डॉक्टरांनी जपली प्रामाणिकपणाची वीण

या कठीण प्रसंगात रुग्णवाहिकेचे डॉ. फैजान जागीरदार यांनी प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण सादर केले. जखमी राजेश राठोड यांच्याकडे असलेले १० हजार रुपये रोख आणि त्यांचे पाकीट डॉक्टरांना सापडले. त्यांनी ही संपूर्ण रक्कम व साहित्य सुरक्षितपणे जखमीच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले.

याप्रकरणी पातूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे.

Related to this topic: