Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

गंगाखेड अपघाती मृत्यु

परभणीत रस्त्यात फसलेल्या ट्रकवर दुचाकी आदळून एक ठार

Gangakhed Accidental Death: गंगाखेड येथे पुलाच्या कामाचे ठिकाणी रस्त्यात अडकलेल्या उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून एका इसमाचा मृत्यु झाल्याची घटना गंगाखेड ते परळी रस्त्यावरील निळा पाटी परिसरात घडली


परभणीत रस्त्यात फसलेल्या ट्रकवर दुचाकी आदळून एक ठार

Gangakhed Accidental Death |

 

गंगाखेडच्या परळी रस्त्यावरील घटना

परभणी (Gangakhed Accidental Death) : गंगाखेड येथे पुलाच्या कामाचे ठिकाणी रस्त्यात अडकलेल्या उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून एका इसमाचा मृत्यु झाल्याची घटना मंगळवार २८ जुलै रोजीच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास गंगाखेड ते परळी रस्त्यावरील निळा पाटी परिसरात घडली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, गंगाखेड परळी रस्त्यावरील निळा पाटी शिवारात सुरु असलेल्या पुलाचे कामाच्या ठिकाणी मंगळवार २८ जुलै रोजी दुपारी विटाने भरलेला एक ट्रक अडकून पडला. रात्री उशिरापर्यंत हा ट्रक रस्त्यावरून बाजूला करण्यास चालकाला अपयश आल्याने हा ट्रक रस्त्यात तसाच उभा असतांना रात्री ११ वाजेच्या सुमारास परळी येथे मुलीला भेटून परळी येथून दुचाकीवरून गंगाखेड मार्गे परभणीकडे निघालेल्या रमेश लक्ष्मण कोकाटे वय ४५ वर्ष रा. सुभेदार नगर परभणी यांची दुचाकी रस्त्यात उभ्या ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात रमेश कोकाटे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला (Gangakhed Accidental Death) अपघाताची माहिती समजताच खाजगी रुग्णवाहिका चालक दिपक सपकाळ, भागवत दुधाटे यांनी घटनास्थळी धाव घेत तेथे उपस्थित ग्रामस्थ व सोनपेठ पोलीस ठाण्याचे एएसआय मंचक जाधव, पोह राजेश मस्के, सतीश कांबळे आदींच्या मदतीने गंभीर जखमी कोकाटे यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले.

बुधवार २९ जुलै रोजी सकाळी पोह प्रभाकर बाजगीर, अमृत देवकते यांनी पंचनामा केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सोनपेठ पोलीस ठाण्यात सुरु होती. रमेश लक्ष्मण कोकाटे यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.