Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

आखाडा बाळापूर ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न

ग्रामपंचायत सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम १२ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष ग्रामसभेत पार पडला.


आखाडा बाळापूर ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न

Reservation Draw |

विशेष ग्रामसभेत सहा प्रभागांतील १७ सदस्यांसाठी आरक्षण जाहीर

आखाडा बाळापूर (Reservation Draw) : ग्रामपंचायत सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम १२ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष ग्रामसभेत पार पडला. मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे, ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी शिंदे आणि ग्राम महसूल अधिकारी एकनाथ कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली.

आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीमध्ये एकूण सहा प्रभाग असून १७ सदस्य पदे आहेत. ग्रामसभेदरम्यान विविध प्रवर्गांनुसार सदस्य पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.

प्रभागनिहाय आरक्षण

प्रभाग क्रमांक १ :

  • अनुसूचित जमाती (पुरुष)
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष)
  • सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक २ :

  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
  • सर्वसाधारण स्त्री
  • सर्वसाधारण पुरुष

प्रभाग क्रमांक ३ :

  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
  • सर्वसाधारण स्त्री
  • सर्वसाधारण पुरुष

प्रभाग क्रमांक ४ :

  • अनुसूचित जाती (पुरुष)
  • सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक ५ :

  • अनुसूचित जाती (स्त्री)
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष)
  • सर्वसाधारण पुरुष

प्रभाग क्रमांक ६ :

  • अनुसूचित जाती (स्त्री)
  • सर्वसाधारण पुरुष
  • सर्वसाधारण महिला

आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास प्रशासक सरपंच भिमाबाई नरवाडे, उपसरपंच मोहम्मद जिया कुरेशी, माजी सभापती संजय बोंढारे, काँग्रेस नेते मोहम्मद जकी कुरेशी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालाजी बोंढारे, शिवसेना उपजिल्हा संघटक सोपान पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. संतोष बोंढारे, माजी उपसरपंच विजय बोंढारे, शिवचरण गोयंका, शहाबाज कुरेशी, संदीप नरवाडे, युवा नेते नागेश बोंढारे, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान खंदारे, भाजप अध्यक्ष गजानन बोंढारे, सुशील बोंढारे, विनायक पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य मोहम्मद गौस, राजू सेवनकर, विठ्ठल पंडित, माजी सभापती शेषराव बोंढारे, शेख जहीर, शेख अज्जू, भगीरथ पंडित, संदीप बोंढारे, प्रकाश कोळेकर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: