अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी उभारलेल्या सुसज्ज केंद्राचा ग्रामस्थांच्या उपस्थितीत शुभारंभ
घोट, प्रतिनिधी : हळदवाही-रेगडी जिल्हा परिषद क्षेत्रातील रेगडी गावात नव्याने उभारण्यात आलेल्या अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
रेगडी गावातील लहान बालकांसाठी सुसज्ज अंगणवाडी केंद्राची गरज लक्षात घेऊन या केंद्रास मंजुरी मिळवून देण्यासाठी सुरेश शहा यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे केंद्र गावातील बालकांच्या सेवेसाठी औपचारिकरित्या सुरू करण्यात आले.

यावेळी बोलताना सुरेश शहा म्हणाले, "अंगणवाडी ही बालकांच्या शिक्षण व सर्वांगीण विकासाची पहिली पायरी आहे. येथूनच बालकांच्या जीवनप्रवासाची सुरुवात होईल आणि भविष्यात ते विविध क्षेत्रांत उंच भरारी घेतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला रेगडीच्या सरपंच सुरेखा गेडाम, सचिव गुगलत साहेब, हळदवाहीचे उपसरपंच छत्रपती दुर्गे, अजय पुडो, सामाजिक कार्यकर्ते उमेश मल्लिक, पलाश घरामी, मुरलीधर रॉय, बाजीराव गावडे, विश्वनाथ गेडाम, देवराव खंडरे, प्रशांत मोहुर्ले, नीताई मंडल तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.