Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

गजानन कावरखे

शेतकर्‍यांसाठी आंदोलन करणार्‍या गजानन कावरखे यांच्यावर पोलिसांनी बजावली हद्दपारीची नोटीस

Gajanan Kavarkhe: मराठवाड्यातील क्रांतीकारी शेतकर्य संस्था ‘मराठवाडा क्रांतिकारी शेतकरी संघटन’चे अध्यक्ष गजानन प्रकाश कावरखे यांवर हिंगोलीत एक वर्षाचे हद्दपार करण्याच्या नोटीस


शेतकर्‍यांसाठी आंदोलन करणार्‍या गजानन कावरखे यांच्यावर पोलिसांनी बजावली हद्दपारीची नोटीस

Gajanan Kavarkhe |

हिंगोली (Gajanan Kavarkhe) : कोणत्याही ठिकाणी शेतकर्‍यांवर अन्याय होत असल्यास क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमांतून मराठवाडा अध्यक्ष गजानन प्रकाश कावरखे यांनी वेळोवेळी आंदोलन करून शेतकर्‍यांना न्याय देण्याची भूमिका वठवली. परंतु त्यांच्यावरच पोलिसांनी हिंगोली जिल्ह्यातून एक वर्षाकरीता हद्दपार करण्याबाबतची प्रस्तावित कारवाई केल्याने शेतकर्‍यांतून संताप व्यक्त होत आहे. 

मराठवाडा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न व अडचणी दूर करण्या करीता वेळोवेळी आंदोलन करण्यात आले. वेळ प्रसंगी पदाधिकार्‍यांवर पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले. परंतु या गुन्ह्यांना न डगमगता पदाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या न्याय व हक्कासाठी आंदोलन सुरूच ठेवले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन प्रकाश कावरखे यांना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय उपविभाग हिंगोली ग्रामीण यांच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातून एक वर्षाकरीता प्रस्तावित हद्दपारीची कारवाई करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली.

या नोटीसमध्ये गजानन कावरखे (Gajanan Kavarkhe) यांच्यावर १४ गुन्हे दाखल असल्याचे नमुद केले असुन प्रामुख्याने गोरेगाव पोलिस ठाण्यासह सेनगाव व हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झालेले १४ गुन्हेही न्याय प्रविष्ट असल्याचे नमुद केले आहे. शेतकर्‍यांसाठी आंदोलन करणार्‍या गजानन कावरखे यांच्यावर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई प्रस्तावित केली असल्याने क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह शेतकर्‍यांतून संताप व्यक्त केला जात आहे.

Related to this topic: