Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

आ. श्वेताताई महाले पाटील

आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या पाठपुराव्याने रानअंत्री तीर्थक्षेत्राच्या विकासकामांचे लोकार्पण

MLA Shweta Mahale Patil: रानअंत्रीतीर्थक्षेत्रात आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या पाठपुराव्याने विकासकामांचे लोकार्पण झाले. नव्याने उभारलेल्या डोम सभामंडपाने धार्मिक कार्यक्रमासाठी सोयीसुविधा


आ श्वेताताई महाले पाटील यांच्या पाठपुराव्याने रानअंत्री तीर्थक्षेत्राच्या विकासकामांचे लोकार्पण

MLA Shweta Mahale Patil |

 

डोम सभामंडप भाविकांच्या सेवेत

चिखली (MLA Shweta Mahale Patil) : चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांच्या पुढाकाराने व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे परमपूज्य सद्गुरू परमानंद नारायण सरस्वती मठ, रानअंत्री येथे ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या विविध विकासकामांचे तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या डोम सभामंडपाचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

रानअंत्री हे परिसरातील श्रद्धास्थान मानले जात असून येथे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तीर्थक्षेत्राचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध व्हावा आणि परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने आमदार श्वेताताई महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला आहे.

नव्याने उभारण्यात आलेल्या डोम सभामंडपामुळे धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन व विविध सांस्कृतिक उपक्रमांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असून भाविकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच तीर्थक्षेत्र परिसरातील विविध विकासकामांमुळे येणाऱ्या भाविकांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत.

या सोहळ्यास संस्थानचे अध्यक्ष वसंतराव झाल्टे, अंकुशराव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, गोपीनाथजी लहाने, दासा पाटील, भगवानराव बंगाळे, विष्णू झगरे सर, शिवसेना नेते प्रदीपभाऊ वाघ, सरपंच प्रदीप थिगळे, सरपंच अरुण सरनाईक, गजानन झाल्टे, एकनाथराव झाल्टे, नंदकिशोर धोडगे, गजानन धोडगे सर, निखिल पडघान, किशोर कणखर सर, संतोष झाल्टे, विश्वासराव झाल्टे, विलास इंगळे, विनायकराव झाल्टे, कैलासराव झाल्टे आदी मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: