Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

राज्य पट पडताळणी

राज्यभर शाळांमध्ये पट पडताळणी; बोगसगिरीचा उलगडा होणार!

State Pat Verification: राज्यभरातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची पट पडताळणी केली जाणार आहे. यामुळे बोगस हजेरी आणि बोगसगिरीचा पर्दाफाश होऊ शकतो.


राज्यभर शाळांमध्ये पट पडताळणी बोगसगिरीचा उलगडा होणार

State Pat Verification |

आधार कार्डची बोगसगिरी उघड होणार? 

लातूर (State Pat Verification) : राज्याच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची एकाचवेळी पटपडताळणी करण्याचा निर्णय राज्यभर शिक्षण विभागाने घेतला असून शनिवार (दि. ११) पासून त्याची सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या परीक्षांच्या महत्वाच्या विषयाच्या पेपरच्या दिवशी ही पटपडताळणी होणार आहे. त्यामुळे ज्या संस्थांनी एजंटाला हाताशी धरून अन्य इंग्रजी, स्वंय अर्थसहाय्य शाळांतून विद्यार्थी आधार कार्ड विकत घेऊन हजेरीपट फुगवला आहे. अशा  संस्था चालकांचे धाबे दणाणले आहेत. आजही अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्येचे आकडे फुगविलेले आहेत. जर एकाच दिवशी ही (State Pat Verification) पडताळणी झाली तर अनेक ठिकाणची बोगसगिरी समोर येणार आहे. 

राज्यात यापूर्वी काही वर्षांपूर्वी व्यापक स्वरूपात पटपडताळणी मोहीम हेतूने घेण्यात आली होती, त्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी बोगस असल्याचे समोर आले होते. आता मागच्या वर्षी त्याच संदभनि पुन्हा एकदा एकाचवेळी पटपडताळणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानुसार आता राज्यभरात ११, १५ आणि २२ एप्रिल रोजी पहिली ते आठवी तसेच ९ वी आणि ११ वी ची पटपडताळणी करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. ही (State Pat Verification) पटपडताळणी परीक्षेच्या दिवशीच व्हावी यासाठी ९ वी आणि ११ वी च्या मराठी, गणित आणि इंग्रजी विषयांची परीक्षा या तीन तारखांना ठेवावी असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिले आहेत. तसेच या व्यापक पटपडताळणीसाठी पुरेशा स्वरूपात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे आता आधार कार्ड विकत घेऊन पटसंख्येच्या बाबतीत बोगसगिरी करणाऱ्या संस्था चालकांचे धबडे दणाणले आहेत. त्यामुळे अनेक खटाटोप करण्यात संस्था सरसावले आहेत.

मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचा विरोधी सूर

एकीकडे अशा प्रकारच्या व्यापक पटपडताळणीमधून शिक्षण क्षेत्रातील बोगसगिरी समोर येणार असताना अशा उपक्रमांचे स्वागत करण्याऐवजी अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमाइक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाने मात्र सदरची पटपडताळणी (State Pat Verification) रद्द करण्याची मागणी केली आहे. शाळांचे परीक्षांचे नियोजन बिघडेल आणि त्याचा परिणाम निकाल तयार करण्याच्या कामावर होईल असले कारण यासाठी पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे हे महामंडळ संस्था चालकांची ढाल बनू पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related to this topic: