Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

Rajyamata Gomata Samvad Yatra

रविवारी नांदेडमध्ये ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यात ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा २०२६’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.


रविवारी नांदेडमध्ये ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’

Rajyamata Gomata Samvad Yatra |

गोमाता संवाद यात्रेस गोभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : मारोतराव कंठेवाड

नांदेड (Rajyamata Gomata Samvad Yatra) : पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यात ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा २०२६’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प.पू. जगदीशजी महाराज बाबाजी यांचे आशीर्वाद लाभणार आहेत.

हा कार्यक्रम रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता ‘विसावा पॅलेस’, नाना-नानी पार्कजवळ, शिवाजीनगर पोलीस स्टेशन शेजारी, नांदेड येथे पार पडणार आहे.

या गोमाता संवाद यात्रेच्या अध्यक्षस्थानी नांदेडचे पालकमंत्री तथा बहुजन कल्याण व दुग्धविकास मंत्री ना. अतुल सावे असणार आहेत. तर मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखरजी मुंदडा मार्गदर्शन करणार आहेत. गोमाता संवाद यात्रेस गोभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गोशाळा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारोतराव कंठेवाड यांनी केले आहे.

या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण, आ. हेमंत पाटील (राज्यमंत्री दर्जा), महापौर सौ. कविता संतोष मुळे, खा. डॉ. अजित गोपछडे, खा. प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण, खा. नागेश पाटील आष्टीकर, खा. डॉ. शिवाजीराव बंडप्पा काळगे, आ. विक्रम वसंत काळे, आ. सतीश भानुदास चव्हाण आणि आ. अमरनाथ राजूरकर उपस्थित राहणार आहेत.

तसेच विशेष उपस्थिती म्हणून आ. बालाजीराव कल्याणकर, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. भीमराव केराम, आ. डॉ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, आ. जितेश अंतापूरकर, आ. आनंद शंकर पा. तिडके, आ. बाबूराव कदम कोहळीकर आणि आ. कु. श्रीजया अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती लाभणार आहे.

प्रशासकीय विभागातून विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक डॉ. निलभ रोहन, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे तसेच नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित राहणार आहेत.

या यात्रेचा २२ जून रोजी पुणे येथून भव्य शुभारंभ झाला असून, दि. ५ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूर येथे समारोप होणार आहे. दरम्यान ही यात्रा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाणार असून, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा (राज्यमंत्री दर्जा), सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी आणि मनीष वर्मा हे पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत.

गोसंवर्धन, गोसेवा आणि भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविणे, गोसेवा आयोगाच्या तीन वर्षांतील कार्याचा आढावा, गोशाळांसाठीच्या योजना, गोपालनाविषयी शासनाची भूमिका जनतेसमोर मांडणे तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन आणि गोशाळा यांच्यात सुसंवाद निर्माण करणे हा या यात्रेचा उद्देश आहे.

गोशाळा स्वावलंबी करण्याच्या प्रयत्नांतर्गत जिल्ह्यातील काही गोशाळांकडून गोमय, गोमूत्र आणि पंचगव्यापासून तयार करण्यात आलेल्या दैनंदिन वापरातील वस्तूंचे स्टॉलही उभारण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाने होणार आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन नांदेड जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय उपायुक्त डॉ. सखारामजी खुणे, जिल्हा पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. अरविंद गायकवाड, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, गोशाळा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारोतराव कंठेवाड, हरीशजी तिवारी, अच्युत महाजन, सत्यवानजी गरुडकर, सनतकुमार महाजन, रघुनाथ सुगावे, रामजीभाई भानुशाली, भवानभाई पटेल यांच्यासह जिल्ह्यातील गोशाळांचे संचालक करीत आहेत.

गोवंश रक्षण, संवर्धन आणि जनजागृतीच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व गोशाळा संचालक, गोप्रेमी, पदाधिकारी, पशुपालक शेतकरी, दानशूर दाते आणि गोभक्तांनी रविवारी सायंकाळी ४ वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गोशाळा महासंघाचे अध्यक्ष मारोतराव कंठेवाड आणि सचिव प्रल्हाद घोरबांड गुरुजी यांनी केले आहे.

Related to this topic: