Rajendra Kale Journalism Award: २०२६चा ना. गो. अनोकार उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देशोन्नतीचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे (Rajendra Kale Journalism Award) यांना सन्मानपूर्वक प्रदान
ना. गो. अनोकार यांच्या पत्रकारितेतील स्मृती प्रेरणादायी- राजेश राजोरे
खामगाव (Rajendra Kale Journalism Award) : पत्रकारितेच्या माध्यमातून अनोकार साहेबांनी त्यांची स्वतंत्र ओळख तयार करून, या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या पत्रकारांना सातत्याने प्रोत्साहन देण्याची काम केल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार तथा देशोन्नतीचे आवृत्ती संपादक राजेश राजोरे यांनी केले. अनोकार परिवाराने त्यांच्या स्मृती जपण्यासाठी सुरू केलेला उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नवीन पिढीला प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले. २०२६चा "ना. गो. अनोकार उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार" देशोन्नतीचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे (Rajendra Kale Journalism Award) यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी श्रीमती उषाताई नागोराव अनोकार यांनी संपादित केलेल्या "वेचलेले मोती" या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
'स्व. ना. गो. अनोकार उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार' सोहळा खामगाव येथील वारकरी भवनात बुधवार २९ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता, यावेळी राजेंद्र काळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी श्रीमती उषा नागोराव अनोकार यांनी संकलित केलेल्या ‘वेचलेले मोती’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या (Rajendra Kale Journalism Award) सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे, अपर पोलीस अधीक्षक पियुष विलास जगताप, प्रेस क्लब खामगावचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोर भोसले, खरेदी-विक्री संघाच्या संचालिका प्रमिलाताई बळीराम वानखडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आरंभी प्रतिमा पूजन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविकातून डॉ. दुर्गेश अनोकार यांनी पुरस्कारामागील प्रेरणा, स्व. न. गो. अनोकार यांचे पत्रकारितेतील योगदान आणि पत्रकारितेतील मूल्यांचे जतन करण्याच्या उद्देशाने या पुरस्काराची सुरुवात करण्यात आल्याचे सांगितले. यानंतर अतिरिक्त सरकारी अभियोक्ता क्षितीज अनोकार यांनी त्यांच्या आयुष्यावर वडिलांच्या संस्कारांचा प्रभाव आणि त्यामुळे सर्व कुटुंबियांचे समाजातील स्थान यावर प्रकाश टाकला.
यानंतर रु. २१,००० रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन राजेंद्र काळे यांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी हा सन्मान स्व. न. गो. अनोकार यांच्या स्मृतींना अर्पण करत पुरस्काराची रक्कम श्री गजानन विजय या ग्रंथावरील "काव्याद्याय" या आगामी पुस्तकासाठी अर्पण केली. यानंतर ‘वेचलेले मोती’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाच्या निर्मितीत विवेक बेन्दरकर यांचे मोलाचे योगदान असल्याचा उल्लेख आपल्या मनोगतात राजेश राजोरे यांनी करुन सलग दुसऱ्या वर्षीही पुरस्कार निवड समितीने योग्य व्यक्तीची निवड केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी कु. प्राची अनोकार हिने व्यक्त केलेल्या मनोगतात अनोकार आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला. याचवेळी पत्रकार ईश्वरसिंह ठाकूर तसेच साहित्यिक विनोद डीडवाणिया यांचा त्यांच्या सामाजिक, साहित्यिक व पत्रकारितेतील योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
आपल्या मनोगतात प्रशांत देशमुख यांनी खामगाव येथील पत्रकार भवन उभारणीमध्ये स्व. नागोराव अनोकार यांचा सिंहाचा वाटा होता, याची आठवण करून देत त्यांच्या पत्रकारितेतील दूरदृष्टी, संघटन कौशल्य आणि पत्रकार बांधवांसाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. पियुष जगताप, ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे, किशोर भोसले तसेच पुरस्कारप्राप्त राजेंद्र काळे यांनीही मनोगत व्यक्त करून स्व. न. गो. अनोकार यांच्या पत्रकारितेतील योगदानाला अभिवादन केले. अशा पुरस्कारांमुळे मूल्याधिष्ठित पत्रकारितेला नवी प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजीव तोटे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन यशोधन भाले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत देशमुख यांनी केले. कार्यक्रमास पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.