Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

बळीराजा साखर कारखाना परिसरात धाडसी चोरी; १० ते १५ लाखांचा मुद्देमाल लंपास

पूर्णा येथील कर्मचार्‍यांचा निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री डल्ला मारत धाडसी घरफोड्यांची मालिका रचल्याची घटना १९ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे.


बळीराजा साखर कारखाना परिसरात धाडसी चोरी १० ते १५ लाखांचा मुद्देमाल लंपास 

Purna Theft Case |

परिसरात भीतीचे वातावरण

पूर्णा (Purna Theft Case) : पूर्णा येथील कानडखेड शिवारातील बळीराजा साखर कारखाना परिसरात राहात असलेल्या कारखाना कर्मचार्‍यांचा निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री डल्ला मारत धाडसी घरफोड्यांची मालिका रचल्याची धक्कादायक घटना रविवार १९ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, बळीराजा साखर कारखान्यांच्या परिसरात अनेक कर्मचारी राहातात. त्या वस्तीत रवीवार राञी सहा घरे फोडुन  घरातील सोन्या-चांदीचे दागिने, तसेच सुमारे दीड लाखांची रोकड असा एकूण १० ते १५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

चोरट्यांनी शनिवार १८ एप्रिल रोजीच्या रात्री एकाच वेळी सहा क्वार्टर्सची कुलुपे तोडून आत प्रवेश केला. परमेश्वर उत्तमर होंडाळे, सुभाष मारोती पवार, रामलिंग नं गणेश जाधव, साईनाथ ढोणे व अभिम गव्हाणे यांच्या घरांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये होंडाळे व पवार त्यांच्या घरातील कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा १० ते १५ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी नेल्याची प्रार्थमिक माहिती आहे.

सदर प्रकार इतर कर्मचार्‍यांच्या निदर्शनास येताच तातडीने संबंधितांना व पूर्णा पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.समाधान पाटील, पो.नि.विलास गोबाडे यांच्यासह फौजदार श्रीनिवास पडलवार, जमादार रमेश मुजमुले, पोशि. सुधिर काळे, बालाजी शेंबेवाड, शैलेश टाकरस आदीं पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला.

अधिक तपास शोधुन काढण्यासाठी ठसे तज्ञ, श्वान पथक व फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही  तपासासाठी घटनास्थळी दाखल झाले. सदरील प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. एकाच रात्री अनेक घरफोड्या झाल्यामुळे कारखाना परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व कर्मचार्‍यांकडून होत आहे. पुढील तपास  पूर्णा पोलीस करत आहेत.

Related to this topic: