Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

दुसऱ्या दिवशीही पेट्रोल पंपांवर रांगा

शहरातील विविध पेट्रोल पंपांवर मंगळवारसह बुधवारीसुद्धा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.


 दुसऱ्या दिवशीही पेट्रोल पंपांवर रांगा

Public Panic |

प्रशासनाकडून पुरेसा साठा असल्याचा दावा

नागपूर (Public Panic) : शहरातील विविध पेट्रोल पंपांवर मंगळवारसह बुधवारीसुद्धा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. इंधन तुटवड्याच्या अफवांमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी गर्दी केली. मात्र, प्रशासनाने इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा करत नागरिकांना घाबरून जाण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांमध्ये संभ्रम भीती

शहरातील प्रमुख चौकांजवळील आणि - महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच वाहनांची वर्दळ वाढली. काही ठिकाणी दोनचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रांगा रस्त्यावरपर्यंत पोहोचल्याने वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. अनेक नागरिकांनी भविष्यात इंधन मिळणार नाही या भीतीने अतिरिक्त साठा करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, इंधन पुरवठ्यात अडचण निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. काही ठिकाणी टँकर उशिरा पोहोचल्यामुळे तात्पुरती अडचण निर्माण झाली असली तरी शहरात एकूण इंधन साठा पुरेसा असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पेट्रोल पंप चालकांनीही घाबरून इंधन साठवणूक करण्याची गरज नसल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासन आणि तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे परिस्थितीचा आढावा घेतला.

शहरातील सर्व पेट्रोल पंपांना नियमित पुरवठा सुरू असून कुठेही तुटवडा निर्माण होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले. वाहतूक पोलिसांनी काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या. रांगा सुरळीत ठेवण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले. दरम्यान, तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारच्या अफवांमुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होतो आणि नागरिकांनाच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आवश्यक तेवढेच इंधन भरून घ्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे. एकूणच, शहरात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही अफवांमुळे निर्माण झालेल्या गर्दीमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माणझाले. मात्र, प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती हळूहळू सुरळीत होत असल्याचे चित्र आहे.

गरजेपेक्षा अधिक पेट्रोल डिझेलची खरेदी करू नका - जिल्हाधिकारी

अधिक सुरक्षितता आणि अनावश्यक काळजी या दोन गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून ग्राहक भीतीपोटी आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करीत आहेत. एरव्ही ज्यांना जेवढी गरज आहे तेवढेच इंधन घेण्याचा ग्राहकाचा कल होता. तो गेल्या दोन ते तीन दिवसात विस्कळीत झाला आहे. पुरवठ्याचे गणित आणि त्याची असलेली पुरवठ्याची श्रृंखला विस्कळीत झाल्यामुळे पेट्रोलपंपांवर पेट्रोल संपल्याचे फलक लागत असल्याचे चित्र आहे. जनतेने अधिक पॅनिक होता अथवा गरजेपेक्षा अधिक पेट्रोल डिझेलची खरेदी केल्यास पुरवठ्याची ही साखळी पूर्ववत येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.

३५ लाख लिटर पेट्रोल साठा उपलब्ध

सद्यस्थितीत संपूर्ण नागपूर जिल्ह्यात कोटी पाच लाख लिटर डिझेल उपलब्ध आहे. सुमारे ३५ लाख लिटर पेट्रोल उपलब्ध आहे. हे प्रमाण नागपूर जिल्ह्याच्या नित्य गरजेपेक्षा अधिक आहे. साधारणतः जिल्ह्यात वाहनधारक दोन चाकी वाहनात दररोज लोक ५० ते १०० रुपयांपर्यंत पेट्रोल भरत होते. ते आता ५०० ते ८०० रुपयांचे पेट्रोल भरत आहेत. चारचाकी वाहनांच्या बाबतीतही एरव्हीची खरेदी ३०० ते ६०० रुपये प्रति ग्राहक होती. ती आता ते हजारांपर्यंत वाढली ही वस्तुस्थिती पेट्रोलपंप असोसिएशनने सादर केली. जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीची गरज पूर्ण होईल एवढा साठा पेट्रोल डिझलेची उपलब्धता असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांनीही आपल्या रोजच्या गरजेपुरतेच पेट्रोल अथवा डिझेलची खरेदी करावी, असे आवाहनही पेट्रोलपंप डिलर्स असोसिएशनने केले.

Related to this topic: