Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

प्रियंका गोपालदास बगडिया

हिंगोली येथील कन्या प्रियंका गोपालदास बगडिया यांना कर्करोग विषयात पीएच.डी. पदवी

Priyanka Gopaldas Bagdia: हिंगोलीच्या सुपुत्री कु. प्रियंका गोपालदास बगडिया यांनी कर्करोग संशोधनात लाईफ सायन्स विषयात पीएच.डी. पदवी संपादन करून हिंगोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला


हिंगोली येथील कन्या प्रियंका गोपालदास बगडिया यांना कर्करोग विषयात पीएचडी पदवी

Priyanka Gopaldas Bagdia |

हिंगोली (Priyanka Gopaldas Bagdia) : हिंगोलीच्या सुपुत्री कु. प्रियंका गोपालदास बगडिया यांनी कर्करोग संशोधनात लाईफ सायन्स विषयात पीएच.डी. पदवी संपादन करून हिंगोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे. 

प्रियंका बगडिया (Priyanka Gopaldas Bagdia) यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत उज्ज्वल राहिला आहे. इयत्ता नववीपर्यंत त्यांनी सरजूदेवी स्कूल, हिंगोली येथे शिक्षण घेतले. पुढे इयत्ता नववी व दहावीसाठी नवोदय विद्यालयात प्रवेश घेतला आणि तिथूनच त्यांच्या यशाची घोडदौड सुरू झाली. महाविद्यालयीन शिक्षण यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे पूर्ण केले. त्यानंतर न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली येथून पदवी आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर त्या कायम टॉपर राहिल्या आहेत.

आपल्या संशोधन प्रवासात त्यांनी नवोदय मेरिटोरियस, INSPIRE Scholarship, CSIR-NET (SPMF), MH-SET, GATE, DBT-NET आणि PET या प्रतिष्ठित परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण केल्या आहेत. भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) आणि टाटा मेमोरियल सेंटर - ACTREC येथेही त्यांनी पात्रता मिळवली आहे.

प्रियंका (Priyanka Gopaldas Bagdia) यांचा संशोधन पेपर प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल FASEB मध्ये प्रकाशित झाला असून त्यांच्या संशोधन कार्याला जर्नलच्या कव्हर पेजवर स्थान मिळाले, ही हिंगोलीसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक सेमिनारमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून पुरस्कार पटकावले आहेत. त्यांना 'आविष्कार' पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 

कर्करोगासारख्या गंभीर विषयावर संशोधन करून समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या प्रियंका बगडिया (Priyanka Gopaldas Bagdia) यांचे हे यश त्यांच्या कुटुंबासह हिंगोली जिल्ह्यासाठी अत्यंत गौरवास्पद आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.