Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

कलगीतुर्‍यात शिवसेना; अंतर्गत कटबाजीचा स्फोट, बैठकीतच हाणामारी!

शिवसेनेतील अंतर्गत वाद अखेर उघडपणे समोर आला असून, जिल्हा संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीतच झालेल्या बैठकीत घोषणाबाजी, गदारोळ आणि थेट हाणामारीपर्यंत परिस्थिती गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


Political Clash

देऊळगाव राजा (Political Clash) : तालुक्यातील शिवसेनेतील अंतर्गत वाद अखेर उघडपणे समोर आला असून, जिल्हा संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीतच झालेल्या बैठकीत घोषणाबाजी, गदारोळ आणि थेट हाणामारीपर्यंत परिस्थिती गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संघटनात्मक आढावा आणि आगामी कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीस संपर्कप्रमुख संजय सोनार, डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार बळीराम मापारी  तालुकाप्रमुख सुदाम काकड  भाग्यश्री खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र नियोजनासाठी बोलावलेली ही बैठक काही क्षणातच वादाच्या भोवऱ्यात अडकली.

बैठकीदरम्यान तालुकाप्रमुख सुदाम काकड यांनी माईकवरून “कोणताही सत्कार होणार नाही आणि कोणालाही बोलण्याची संधी दिली जाणार नाही” असा आदेश दिल्यानंतरच वादाची ठिणगी पडली. यामुळे संतप्त झालेल्या माजी जिल्हा उपप्रमुख दीपक बोरकर, अनिल शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी सुरू केली.

बैठकीस न बोलावल्याचा राग मनात धरून कार्यकर्त्यांनी उपस्थित मान्यवरांसमोरच गदारोळ घातला. विशेष म्हणजे जिल्हा संपर्कप्रमुखांच्या सत्कार कार्यक्रमालाही विरोध करत “आम्हाला का बोलावले नाही?” असा जाब विचारण्यात आला. यावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र होत गेले आणि शाब्दिक वादाचे रूपांतर थेट धक्काबुक्की व हाणामारीत झाले. काही काळ परिस्थिती पूर्णतः नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र होते. वरिष्ठ नेत्यांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली. मात्र या घटनेमुळे पक्षातील गटबाजी आणि समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा उघड झाला आहे.

दरम्यान, मागील काळात दीपक बोरकर यांना उपजिल्हाप्रमुख पदावरून तसेच अनिल चित्ते यांनाही पदावरून काढण्यात आल्यामुळे अंतर्गत नाराजी वाढली होती. त्याचाच परिणाम या वादात दिसून आल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. याशिवाय नगरपालिका व विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना (शिंदे गट) पराभूत झाल्यानंतर गटातटाचे राजकारण अधिकच तीव्र झाले. पराभवाची जबाबदारी एकमेकांवर ढकलत “मी पक्षासाठी काम केले” असा दावा प्रत्येकजण करत असताना, खरे कारण मात्र वेगळेच असल्याचे बोलले जात आहे. या सर्व असंतोषाचा स्फोट अखेर स्थानिक बैठकीत झाला.

एकूणच, शिवसेनेतील अंतर्गत कटबाजी आणि कलह आता उघडपणे समोर येत असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा ‘कलगीतुरा’ किती वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे पक्षाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जनतेसमोर शिवसेनेचे वास्तव उघडे पडल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता

संजय सोनार संपर्कप्रमुख बुलढाणा शिवसेना या अंतर्गत कलहा बाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की माझ्यासमोर फक्त सत्कारावरून त्यांच्या अंतर्गत वाद समोर आला पण मला याबाबत काही एक माहिती नाही मी नवीनच संपर्क प्रमुख पदी निवड झालेला आहे

माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर याबाबत यांना विचारले असता ही आढावा बैठक येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात बीएओ ठरविण्यासाठी होती. यामध्ये दीपक बोरकर व एकनाथ चित्ते यांनी जाणीवपूर्वक मुद्दामून धुडगूस घालणे, पक्षाला बदनाम करणे व पक्षश्रेष्ठींकडे नकारात्मक संदेश पोहोचवणे केलेले आहे 

जिल्हाप्रमुख बळीराम मापारी 

याबाबत झालेल्या घटनेची चौकशी करून सदर आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल व योग्य निर्णय घेतल्या जाईल. 

दीपक बोरकर माजी जिल्हा उपप्रमुख

नगरपरिषद निवडणुकी बैठकी दरम्यान डॉ. खेडेकर यांनी  कथित अभद्र नगरविकास आघाडीला प्रस्तावाला मी विरोध करत असे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच  माझे पद  .काढून घेण्यात आले आणि मुंबईतील पक्षश्रेष्ठीकडे  वारंवार चुकीची मांडणी करण्यात आली. या बैठकीमध्ये. मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र  माझ्या बद्दल चुकीचे संदेश देत आहे. हे मला शिवसेनेतून कदाचित काढूनही टाकतील  पण माझ्यातील शिवसैनीक कोणीच काढू शकत नाही.

Related to this topic: