Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

पोहरादेवी बसस्थानक स्वच्छतागृह

पोहरादेवी बसस्थानकावरील स्वच्छतागृहाला कुलूप, भाविक व प्रवाशांची मोठी गैरसोय

Pohradevi Bus Stand Toilet: पोहरादेवी बसस्थानकावरील स्वच्छतागृह बंद असल्यामुळे महिलांना, प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांना अडचणी येत आहेत. प्रशासनाने त्वरित स्वच्छता सुविधा उपलब्ध


पोहरादेवी बसस्थानकावरील स्वच्छतागृहाला कुलूप भाविक व प्रवाशांची मोठी गैरसोय

Pohradevi Bus Stand Toilet |

मानोरा (Pohradevi Bus Stand Toilet) : बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे दररोज राज्यभरातून शेकडो भाविक व प्रवासी येत असतात. मात्र येथील बसस्थानकावरील स्वच्छतागृहाला कायम कुलूप असल्याने महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

बसस्थानक परिसरात स्वच्छतागृह असूनही ते बंद अवस्थेत असल्याने प्रवाशांना उघड्यावर जाण्याची वेळ येत आहे. विशेष म्हणजे (Pohradevi Bus Stand Toilet) स्वच्छतागृह परिसरात पाण्याची कोणतीही सुविधा नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोहरादेवी येथे धार्मिक महत्त्व असल्याने दररोज भाविकांची मोठी गर्दी असते. महिलांना सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागत असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन स्वच्छतागृह नियमित सुरू करावे, स्वच्छता राखावी तसेच पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवासी व भाविकांकडून होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, (Pohradevi Bus Stand Toilet) बसस्थानक परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पोहरादेवीच्या प्रतिमेला धक्का बसत आहे. संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन समस्या सोडवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related to this topic: