Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

PMSBY विमा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारे PMSBY विमा क्लेम रुपये 2 लाख मृतक वारसास वितरित

PMSBY Insurance: दि अकोला - वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हि बँकेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक मा. डॉ. संतोषकुमार कोरपे यांच्या नेतुत्वात


जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारे pmsby विमा क्लेम रुपये 2 लाख मृतक वारसास वितरित

PMSBY Insurance |

रिसोड (PMSBY Insurance) : दि अकोला - वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हि बँकेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक मा. डॉ. संतोषकुमार कोरपे यांच्या नेतुत्वात उतरोत्तर प्रगति करत आहे. बँकेद्वारा नाबार्ड च्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येत आहे. रिसोड तालुक्यातील मोप शाखेचे बचत ठेव खातेदार श्रीमती सरूबाई माणिकराव नागरे यांचा अपघाती मृत्यू झाला. ह्या घटनेची माहिती मोप शाखेचे शाखाधिकारी श्री. ए एस जाधव यांना मिळाल्या नंतर  त्यांनी खातेदाराच्या नातेवाईकांना बोलावून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) प्रीमियम रक्कम 20/- मध्ये रक्कम रू. 2 लाखाची  विमा पॉलिसी काढली आहे ह्याची माहिती दिली . तसेच क्लेम फॉर्म  भरून घेऊन / सर्व कागद पत्राची पूर्तता करून घेऊन क्लेम प्रकरण मुख्य कचेरीच्या हिशेब व बँकिंग विभागाचे श्री प्रफुल पाटील यांच्या कडे पुढील कार्यवाही कडे पाठविण्यात आले.

बँकेकडून कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचे ( PMSBY)  रू. 2 लाख रुपयाची रक्कम जमा करण्यात आली ह्या 2 लाख रुपयाचा धनादेश  पॉलिसी धारक कै. सुरूबाई माणिक नागरे यांचा मुलगा तुकाराम माणिक नागरे  यांना बँकेचे  माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक ,बँकेचे मार्गदर्शक मा .डॉ.संतोषकुमार कोरपे,  बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.डॉ. जयराज संतोषकुमार कोरपे नवनिर्वाचित उपाध्यक्ष मा. रामेश्वर सुभाषराव ठाकरे मा. आमदार तथा माजी संचालक अमित झनक, नवनिर्वाचित संचालक मा . डॉ. धिरज वामनराव देशमुख ,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अनंत वैद्य यांच्या मार्गदर्शन खाली  वितरित करण्यात आला.

 सदर कार्यक्रमाला त्यावेळी तालुका प्रमुख सुभाष तलवारे, तसेच मार्केटिंग अधिकारी ग्रेड 1 पी.एन. जाधव, पा. शाखाधिकारी आर.टी.मस्करे.एस पी कोकाटे, श्री ए. एस जाधव शाखाधिकारी शाखा मोप श्री यू जी जायभाये रोखपाल, सर्व निरीक्षक, डी.ए. मुंढे कार्यालयीन सचिव देखरेख संघ, बी. एन. मोरे व सर्व सचिव तथा रिसोड तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटीचे प्रतिनिधी होते. बँकेकडून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा (PMSBY) लाभ मिळाल्याने  खातेदारच्या वारसदारा कडून मा . अध्यक्ष ,उपाध्यक्षा,तथा संचालक मंडळ आणि बँकेचे  मा .मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांचे खुप खुप आभार व्यक्त केले. (PMSBY Insurance) तसेच जास्तीत जास्त खातेदारांनी सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान  बँकेकडून सर्व खातेदारांना करण्यात आले. तसेच या कार्याचे जिल्हाभर बँकेचे कौतुक होत आहे.

Related to this topic: