Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पेडगाव अनोळखी मृतदेह

पेडगाव शिवारात अनोळखी पुरुषाचा मानवी सांगाडा आढळला; ओळख पटविण्याचे आवाहन

Pedgaon Dead Body: पेडगाव ते सिरसम जाणार्‍या रस्त्यावरील पुलाजवळ अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी आवाहन केले आहे.


पेडगाव शिवारात अनोळखी पुरुषाचा मानवी सांगाडा आढळला ओळख पटविण्याचे आवाहन

Pedgaon Dead Body |

बासंबा (Pedgaon Dead Body) : पेडगाव ते सिरसम जाणार्‍या रस्त्यालगतच्या छोट्या पुलाजवळ, पेडगाव शिवारात एका अनोळखी पुरुषाचा मानवी सांगाडा आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

२७ एप्रिल रोजी सकाळी ९:४० वाजेच्या पूर्वी कधीतरी ही घटना घडली असावी. दुपारी  पोलिसांत नोंद करण्यात आली. (Pedgaon Dead Body) मृत व्यक्ती पुरुष असून त्याचे अंदाजे वय २० ते ३० वर्षांच्या दरम्यान आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृताच्या अंगावर पुढील वस्तू आढळून आल्या आहेत. यामध्ये एक लोखंडी (स्टील) चे पांढरे गोल कडे, एक काळ्या रंगाची अंडरवेअर या वर्णनाशी मिळती-जुळती माहिती असलेल्या किंवा कोणतीही व्यक्ती बेपत्ता असल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन बासंबा पोलिसांनी केले आहे. घटनास्थळी सपोनि विकास आडे पोउपनि संदिप जमादार, मदन गव्हाणे, जमादार शिवप्रसाद पोले यांनी भेट दिली.

या (Pedgaon Dead Body) अनोळखी मृतदेहाबद्दल काही माहिती असल्यास संपर्कासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले मो. ७०३८८३३३५८ बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास सी. आडे मो. ९७६३९ ४४४४४ तसेच पोलीस उपनिरीक्षक संदीप जमादार मो. ९०२८१७२८६०, पोउपनि माधव जिवारे मो.८८८८ ८५९९७० यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related to this topic: