Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > पुणे

“पक्ष वेगळे, पण भावनिक पाठिंबा” – रोहित पवार; अजित पवारांच्या आठवणींना रोहित पवारांचा भावनिक उजाळा

बारामती विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.


“पक्ष वेगळे पण भावनिक पाठिंबा” – रोहित पवार अजित पवारांच्या आठवणींना रोहित पवारांचा भावनिक उजाळा

Pawar Family Politics |

बारामती (Pawar Family Politics): बारामती विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून, भावनिक वातावरणात ही निवडणूक पार पडत आहे.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “बारामतीत आम्ही भावनिक दृष्टीकोनातून सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. अजितदादांबद्दल असलेला आदर आणि प्रेम यामुळे कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने त्यांना पाठिंबा देत आहेत. मात्र राजकीयदृष्ट्या आमचे पक्ष वेगळे आहेत, ही वस्तुस्थिती आहे.”

भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत बोलताना त्यांनी ‘पवार विरुद्ध पवार’ लढतीची शक्यता व्यक्त केली. “अजितदादा असताना देखील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पवार कुटुंबातीलच लढती झाल्या होत्या. त्यामुळे २०२९ च्या विधानसभा निवडणुकीतही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही शक्यता नाकारता येत नाही,” असे ते म्हणाले.

पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत जनतेमध्ये असलेल्या अपेक्षांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “बारामतीसह राज्यभरातील लोकांना पवार कुटुंब एकत्र पाहायचं आहे. अजितदादांचीही शेवटच्या काळात हीच इच्छा होती. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत आम्ही विरोधी पक्षात आहोत, तर त्यांचा गट सत्तेत आहे. त्यामुळे एकत्र येण्याचा निर्णय घेणं सोपं नाही. आमदार आणि कार्यकर्त्यांच्या राजकीय बांधिलकी लक्षात घेता हा निर्णय गुंतागुंतीचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

जय पवार यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना रोहित पवार म्हणाले, “कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची, हा संबंधित पक्षाचा अंतर्गत निर्णय असतो. कार्यकर्त्यांची भावना आणि पक्षाची रणनीती महत्त्वाची असते. २०२९ मध्ये बारामतीत कोण उमेदवार असेल, हे त्या वेळी ठरेल. मात्र ती लढत सर्वपक्षीय होण्याची शक्यता आहे.”

ते पुढे म्हणाले, “जर जय पवार उमेदवार म्हणून मैदानात उतरले, तर आमच्या पक्षाकडून युगेंद्र पवार यांना संधी दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ अशी थेट लढत होऊ शकते. जरी ही आमची इच्छा नसली, तरी राजकीय परिस्थितीमुळे असे चित्र निर्माण होऊ शकते. काही राजकीय शक्तींना पवार कुटुंब एकत्र येऊ नये, असे वाटते. पवार कुटुंबाने जनतेच्या सेवेतून उभं केलेलं वलय कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी केला.

याशिवाय, अजित पवार यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना त्यांनी मोठा दावा केला. “अजितदादा जिवंत असताना जर दोन्ही गटांचं विलीनीकरण झालं असतं, तर मी आत्मविश्वासाने सांगतो की २०२९ साली ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. त्यांची कार्यक्षमता, प्रशासनावरची पकड आणि जनतेतील लोकप्रियता यामुळे ते सर्वोच्च पदावर पोहोचले असते,” असे रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, त्यांनी बारामतीकरांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहनही केले. “अजितदादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने मतदानासाठी बाहेर पडावं. काही मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर गेली असली, तरी कार्यकर्त्यांची मदत घेऊन त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा. लोकशाहीमध्ये मतदान ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. बारामतीकर मोठ्या संख्येने मतदान करून सुनेत्रा पवार यांना विजयी करतील, असा मला पूर्ण विश्वास आहे,” असे ते म्हणाले.

शेवटी त्यांनी अजित पवार यांच्याशी संबंधित आठवणींनाही उजाळा दिला. “दादा स्वभावाने कडक होते, पण मनाने अत्यंत मवाळ आणि प्रेमळ होते. लहानपणापासून आम्ही त्यांच्या आणि साहेबांच्या प्रचारात सहभागी होत आलो आहोत. सायकल रॅली, सभा, प्रचार मोहिमा यात सक्रिय सहभाग घेतल्याच्या अनेक आठवणी आहेत. आज त्या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या होत आहेत,” अशा भावनिक शब्दांत रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Related to this topic: