Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

पातूर येथे संत सिदाजी महाराज यात्रा महोत्सवाचा उत्साह

पातूरसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत श्री सिदाजी महाराज यांच्या १३८ व्या भव्य यात्रा महोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताहाने पातूर नगरी भक्तिमय झाली आहे.


पातूर येथे संत सिदाजी महाराज यात्रा महोत्सवाचा उत्साह

Patur Yatra Mahotsav |

आज दहीहंडी व महाप्रसादाचे आयोजन

पातूर (Patur Yatra Mahotsav) : पातूरसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत श्री सिदाजी महाराज यांच्या १३८ व्या भव्य यात्रा महोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताहाने पातूर नगरी भक्तिमय झाली आहे. या महोत्सवाचा मुख्य सोहळा आज, शनिवार २८ मार्च २०२६ रोजी संपन्न होत असून, यानिमित्त दहीहंडी आणि भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

संत श्री सिदाजी महाराज संस्थान व यात्रा पंचमंडळ यांच्या वतीने या महोत्सवाचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. हिंदू मराठी नववर्ष व गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या यात्रेचा प्रारंभ झाला होता. सप्ताहादरम्यान दररोज हरिपाठ, भागवत कथा आणि हरिकीर्तनाचे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले, ज्यामध्ये भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला.

आजचे विशेष कार्यक्रम : 

आज समारोपाच्या दिवशी कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे असेल :

 * काल्याचे कीर्तन: सकाळी ९:३० ते १०:०० या वेळेत ह.भ.प. अमोल महाराज घुगे (पास्तुल) यांचे काल्याचे कीर्तन होईल.
 * दहीहंडी उत्सव: दुपारी १२:०० वाजता दहीहंडी फोडून उत्सवाचा आनंद साजरा केला जाईल.
 * महाप्रसाद: सायंकाळी ५:०० वाजेपासून भव्य महाप्रसादाला सुरुवात होणार आहे.

आयोजकांनी पातूर परिसरातील सर्व भाविकांना या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Related to this topic: