Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > विदर्भ

स्वयं जनगणना मोहीम

पातूर शहरात ‘स्वयं जनगणना जागरूकता’ मोहीम सुरू

Census 2027 Campaign: पातूरमध्ये नागरिकांना स्वत:ची जनगणना करण्यासाठी प्रोत्साहन देत 'स्वयं जनगणना जागरूकता' मोहीम सुरू केली गेली आहे. नागरिकांनी अधिकृत पोर्टलवर माहिती भरण्याचे आवाहन केले जात आहे.


पातूर शहरात ‘स्वयं जनगणना जागरूकता’ मोहीम सुरू

Census 2027 Campaign |

पातूर (Census 2027 Campaign) : नागरिकांनी स्वतःची जनगणना स्वतः करण्यासाठी शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या ‘स्वयं जनगणना’ मोहिमेबाबत पातूर नगर परिषदेकडून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. “तुमचे शहर, तुमची माहिती – चला, स्वतः जनगणना करूया!” या घोषवाक्याखाली नागरिकांना पोर्टलवर नोंदणी करून आपली व कुटुंबाची माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या (Census 2027 Campaign) मोहिमेअंतर्गत नागरिकांनी प्रथम अधिकृत पोर्टलवर मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी. त्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्याची सविस्तर माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. शेवटी अर्ज सबमिट करून ‘प्रोग्रेस आयडी’द्वारे त्याचा ट्रॅक ठेवता येणार आहे. नगर परिषदेकडून सांगण्यात आले की, अचूक जनगणना माहितीमुळे शासनाला विविध योजनांचे योग्य नियोजन करता येते. तसेच शहराच्या विकासासाठी आवश्यक डेटा उपलब्ध होतो आणि प्रशासनात पारदर्शकता वाढते.

नागरिकांनी आजच अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वयं जनगणना पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या (Census 2027 Campaign) उपक्रमासाठी प्रशासक तथा तहसीलदार डॉ. राहुल वानखडे, मुख्याधिकारी अक्षय गडसिंग आणि जनगणना २०२७ चे चार्ज अधिकारी सुनील उगले यांनी सर्व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. “योग्य माहिती, समृद्ध पातूर!” या संदेशासह ही मोहीम राबविण्यात येत असून शहरातील सर्व नागरिकांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related to this topic: