Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

पातुर नगरपरिषद निवडणूक

पातुर नगरपरिषद निवडणूक निकाल; हिदायत खा उर्फ इद्दु पहलवान नगराध्यक्षपदी

Patur Municipal Council Election: पातुर नगरपरिषदच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसचा उमेदवार हिदायत खा उर्फ इद्दू पहलवान विजयी झाला आहे. मतदानाच्या दिवशी पातूर शहरात उत्साहाची वातावरण


पातुर नगरपरिषद निवडणूक निकाल हिदायत खा उर्फ इद्दु पहलवान नगराध्यक्षपदी

Patur Municipal Council Election |

 

काँग्रेस आणि विकास योद्धा मंचाला प्रत्येकी ८ जागा

पातुर (Patur Municipal Council Election) : पातुर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या आणि नगरसेवक पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे काँग्रेसचे उमेदवार हिदायत खा उर्फ इद्दु पहलवान यांनी विकास योद्धा मंचाचे उमेदवार सय्यद बुऱ्हाण यांचा पराभव करत विजय संपादन केला आहे. भाजपचे सचिन ढोणे या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तर दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) पक्षाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सर्व नगरसेवक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

पक्षीय बलाबल आणि आघाड्यांचे चित्र
२० जून रोजी शांततेत मतदान पार पडल्यानंतर, रविवार २१ जून रोजी मतमोजणी करण्यात आली. (Patur Municipal Council Election) नगरपरिषदेच्या एकूण २० जागांसाठी ही निवडणूक पार पडली. यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची युती होती, तर विकास योद्धा मंचासोबत राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढले होते. निकालाअंती नगरपरिषदेमधील जागांचे पक्षीय चित्र खालीलप्रमाणे स्पष्ट झाले आहे:

काँग्रेस: ०८ जागा
विकास योद्धा मंच: ०८ जागा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे): ०२ जागा
भारतीय जनता पक्ष (भाजप): ०२ जागा


नगरपरिषद निवडणुकीतील विजयी उमेदवारांची अधिकृत यादी:
१. काँग्रेस (०८ जागा):
 शितल प्रवीण पोहरे
 मोहम्मद शाकीर मोहम्मद साबीर
 सुनिता साहेबाराव वाघमारे
 साबा अहमद खान अझरखान
 सुमया सदर शेख उस्मान
 मोहम्मद मेहता अब्दुल रुहुफ
 ममता राजेश खोडे
 हमिदाबी

२. विकास योद्धा मंच (०८ जागा):
 डॉ. सय्यद वसीम
 बुशरा अंजुम मोहम्मद बाबर
 साजिया परवीन मोहम्मद कैसर
 कंबर जमा खान आदिल खान
 मोहम्मद फैज मोहम्मद मकसूद
 शरबत जमीन सय्यद मुजाहिद इकबाल
 सय्यद मुजम्मिल हुसेन
 साहिस्ता फिरदोस मोहम्मद इरफान

३. शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे (०२ जागा):
 आनंदा रामभाऊ तायडे
 अजय गजानन पाटील

४. भारतीय जनता पक्ष - भाजप (०२ जागा):
 अश्विनी सुनील पाटील
 तुळसाबाई राजाराम गाडगे

शहरात उत्साहाचे वातावरण
निकालाची अधिकृत घोषणा होताच पातुर शहरात काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत प्रचंड जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. (Patur Municipal Council Election) नवनियुक्त नगराध्यक्ष हिदायत खा उर्फ इद्दु पहलवान यांच्यावर पातुर शहर व परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Related to this topic: