Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

पातुर निवडणूक रणधुमाळी: जिल्हाधिकारी वर्षा मीना व पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा धडक आढावा

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी पातूर शहरातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आल्याचे पाहायला मिळाले.


पातुर निवडणूक रणधुमाळी जिल्हाधिकारी वर्षा मीना व पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा धडक आढावा

Patur Municipal Council Election |

पातूर (Patur Municipal Council Election) : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना व जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी २ जून रोजी पातूर येथे थेट भेट देत निवडणूक तयारी, कायदा-सुव्यवस्था आणि मतदान केंद्रांचा धडक आढावा घेतला.

नगरपरिषद कार्यालयात भेट देऊन त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्त्वपूर्ण निर्देश दिले. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक व कोणत्याही दबावाशिवाय (दबावमुक्त) पार पाडण्याचे आदेश त्यांनी यावेळी यंत्रणेला दिले. या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीच्या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (बाळापूर) संतोष येवलीकर प्रामुख्याने उपस्थित होते.

राजकीय घडामोडींना वेग; ७५ उमेदवार रिंगणात

दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी पातूर शहरातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आल्याचे पाहायला मिळाले. विविध राजकीय गणिते, पक्षनिष्ठा आणि तडजोडींमुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

नगराध्यक्ष पद

नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या एकूण ७ उमेदवारांपैकी ५ उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले आहेत.

एकूण उमेदवार

निवडणुकीच्या रिंगणात एकूण १२० उमेदवारांपैकी आता ७५ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.

पोलिसांची चोख व्यवस्था

जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या अचानक झालेल्या दौऱ्यामुळे पातूर पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले होते. पोलिसांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, शहरात पूर्ण शिस्त आणि सुव्यवस्थितता कायम राखली आहे.

निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज असून, शांततापूर्ण, पारदर्शक आणि निष्पक्ष मतदानासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे चित्र पातूरमध्ये पाहायला मिळत आहे.

Related to this topic: