Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

पातूर धोधानी धबधबा

धोधानी धबधब्यावर मद्यप्रेमींची गर्दी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Patur Dhodhani Waterfall: पातूरमध्ये धोधानी धबधब्यावर माझ्या पर्यटकांच्या गरदीची वाढ आली आहे, तरी मद्‍यप्रेम आणि अश्लील चालणे यामुळे सुरक्षा सवाल निर्माण झाले आहेत.


धोधानी धबधब्यावर मद्यप्रेमींची गर्दी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Patur Dhodhani Waterfall |

पोलिसांचा बंदोबस्त नाही; अश्लील चाळे व मद्यपानामुळे पर्यटक त्रस्त;
अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण?

पातूर (Patur Dhodhani Waterfall) : पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने पातूर तालुक्यातील डोंगराळ भागात निसर्गाचे सौंदर्य खुलले आहे. पातूर शहरापासून सुमारे दहा ते अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या धोधानी धबधब्यावर सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होत असून अकोला, वाशिमसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येथे येत आहेत. विशेषतः शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

मात्र, (Patur Dhodhani Waterfall) पर्यटकांच्या वाढत्या गर्दीसोबतच धबधबा परिसरात मद्यप्राशन करणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. कोणी बिअर घेऊन येतो, तर कोणी व्हिस्की घेऊन येतो, अशी परिस्थिती असल्याने धबधबा परिसरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मद्यप्राशन करून काहीजण धोकादायक ठिकाणी फिरत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.

धोधानी धबधब्यावर (Patur Dhodhani Waterfall) यापूर्वी पाण्यात बुडून काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तसेच आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, सध्या येथे पोलिस प्रशासनाचा पुरेसा बंदोबस्त नसल्याने मद्यप्रेमींना जणू मोकळे रान मिळाले असल्याची चर्चा आहे.

‘जंगल में मंगल’ला आळा घालणार कोण?

धबधबा व परिसरातील जंगलसदृश भागात काही युवक-युवतींकडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अशा प्रकारांमुळे महिला व कुटुंबीयांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, या निर्जन परिसरात एखादी गंभीर अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

वनविभाग व पोलिस प्रशासनाने केवळ गर्दीच्या वेळी पाहणी करण्याऐवजी धबधबा परिसरात नियमित गस्त, मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाई, धोकादायक ठिकाणी प्रवेशास प्रतिबंध आणि महिला-कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निसर्गप्रेमी व पर्यटकांकडून होत आहे.

पर्यटकांची वाढती गर्दी आणि यापूर्वी घडलेल्या दुर्घटनांचा अनुभव लक्षात घेता प्रशासनाने आता तरी गांभीर्याने दखल घेऊन धोधानी धबधब्यावर सुरक्षाव्यवस्था वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related to this topic: