Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर

उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा

उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे ने महत्त्वपूर्ण निर्णय घेत, मुंबई आणि पुणे येथून विदर्भातील नागपूर व अमरावतीकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी 106 विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे.


उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा

Passenger Relief |

मुंबई–पुणे ते नागपूरसाठी 106 फेऱ्या, प्रवाशांना मोठा दिलासा

(Passenger Relief) उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे ने महत्त्वपूर्ण निर्णय घेत, मुंबई आणि पुणे येथून विदर्भातील नागपूर व अमरावतीकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी 106 विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे. या उपक्रमामुळे वाढत्या गर्दीवर आळा बसण्यास मदत होणार असून प्रवास अधिक सुलभ व आरामदायी होणार आहे.

सीएसएमटी–नागपूर विशेष गाड्या

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून गाडी क्रमांक 02141 ही द्विसाप्ताहिक विशेष गाडी 19 एप्रिल ते 14 जुलै या कालावधीत दर रविवारी व मंगळवारी रात्री 12:20 वाजता सुटणार असून त्याच दिवशी दुपारी 3:10 वाजता नागपूर येथे पोहोचणार आहे.
तर गाडी क्रमांक 02142 नागपूरहून दर रविवारी व मंगळवारी रात्री 8 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 1:30 वाजता सीएसएमटी येथे दाखल होईल. या दोन्ही गाड्यांच्या एकूण 52 फेऱ्या होणार आहेत.

प्रमुख थांबे

ही विशेष गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. प्रवाशांसाठी वातानुकूलित तसेच सामान्य श्रेणीतील डबे उपलब्ध असतील.

पुणे–नागपूर–हडपसर विशेष गाडी

पुणे–नागपूर–हडपसर मार्गावरही साप्ताहिक विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 09469 ही 21 एप्रिल ते 14 जुलैदरम्यान दर मंगळवारी सायंकाळी 5:50 वाजता पुण्याहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30 वाजता नागपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक 09470 नागपूरहून दर बुधवारी सकाळी 8 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 7:30 वाजता हडपसर येथे येईल. या गाड्यांच्या एकूण 54 फेऱ्या नियोजित आहेत.

प्रवाशांना दिलासा

उन्हाळ्यातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन करण्यात आलेली ही व्यवस्था नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. विशेषतः विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांना या अतिरिक्त गाड्यांमुळे प्रवास अधिक सोयीस्कर, सुलभ आणि आरामशीर होणार आहे.