Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर

परमेश्वर सरगध सम्मानित

परमेश्वर सरगध को 'इम्प्लोयी ऑफ द मंथ' का पुरस्कार मिला

नाइट पेट्रोलमन परमेश्वर सरगध की विशेष जागरूकता और कर्तव्यनिष्ठा के लिए दक्षिण मध्य रेल्वे ने उन्हें 'इम्प्लोयी ऑफ द मंथ' से सम्मानित किया।


परमेश्वर सरगध को इम्प्लोयी ऑफ द मंथ का पुरस्कार मिला

नाइट पेट्रोलमन परमेश्वर सरगध यांना ‘इम्प्लोयी ऑफ द मंथ’ पुरस्कार

अकोला (प्रतिनिधी): अकोला–पूर्णा रेल्वे विभागात गस्त घालताना दाखविलेल्या सतर्कता आणि कर्तव्यनिष्ठेबद्दल नाइट पेट्रोलमन परमेश्वर सरगध यांना दक्षिण मध्य रेल्वेकडून प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेले परमेश्वर सरगध (ट्रॅक मेंटेनर, नवलगाव) यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल फेब्रुवारी २०२६ महिन्यासाठी मुख्यालय स्तरावर “इम्प्लोयी ऑफ द मंथ (महिन्याचा सर्वोत्तम कर्मचारी)” या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

७ फेब्रुवारी रोजी पूर्णा–अकोला विभागातील माळसेलू–नवलगाव सेक्शनमध्ये रात्री गस्त घालत असताना त्यांनी दाखविलेल्या जागरूकतेच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान देण्यात आला. गस्तीदरम्यान पहाटे ५:३१ वाजता ओएचई मास्ट क्रमांक ८६०/१५-१६ जवळ रेल्वे रुळाच्या वेल्डमध्ये तडे गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे रेल्वे वाहतुकीस गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

प्रसंगावधान राखत सरगध यांनी तात्काळ रेल्वे सुरक्षा नियमांनुसार संबंधित ठिकाणी दोन्ही बाजूंना हँड सिग्नल व डेटोनेटर ठेवून ट्रॅकचे संरक्षण केले आणि येणाऱ्या गाड्यांना इशारा दिला. तसेच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित माहिती दिली.

अभियांत्रिकी पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात तुटलेल्या वेल्डखाली लाकडी ब्लॉक ठेवून व सैल झालेले फिटिंग घट्ट करून आपत्कालीन दुरुस्ती करण्यात आली. खबरदारी म्हणून दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत ३० किमी प्रतितास वेगमर्यादा लागू करण्यात आली.

त्यांच्या वेळेवर केलेल्या तपासणी आणि तत्पर कृतीमुळे ट्रॅक सुरक्षित करण्यात आला व रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू राहिली. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी त्यांच्या नावाची शिफारस करताना सरगध यांच्या जागरूकतेचे कौतुक केले. दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनानेही त्यांच्या कार्याचे विशेष अभिनंदन करत रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दाखविलेल्या समर्पणाची प्रशंसा केली आहे.

Related to this topic: