Parbhani Terrible Accident: परभणीतील रूढी पाटी येथे कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर दोन गंभीर जखमी झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दोघे गंभीर मानवत पोलीसात मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणी गुन्हा...!
परभणी (Parbhani Terrible Accident) : मानवत तालुक्यातील रूढी पाटी येथील राष्ट्रीय महामार्गावर कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील युवकाचा जागीत मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले सदरील घटना शनिवार १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ :३० च्या सुमारास घडली या प्रकरणी रविवार १९ एप्रिल रोजी कार चालकाविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १४ जेई ५६४२ क्रमांकाची मारुती इको कार मानवतच्या दिशेने येत होती, तर एमएच २१ ई एफ ४९६३ क्रमांकाची मोटारसायकल परभणीकडे जात होती. यावेळी सायंकाळी साडे सातच्या सुमारास सदरील कार राष्ट्रीय महामार्गावरील रूढी पाटी जवळ येतात कारचालकाचा ताबा सुटल्याने कार थेट दुचाकीवर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले.
या (Parbhani Terrible Accident) अपघातात रावसाहेब उर्फ राहुल बाबू चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर दिनेश शंकर आडे याच्या डाव्या पायाला प्रâॅक्चर असून डोक्याला गंभीर दुखापत आहे. प्रकाश बाबू चव्हाण यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. तिघेही २५ ते ३० वयोगटातील असून घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव जवळील तांड्यावरचे रहिवासी आहेत अपघातानंतर कारचालकाने वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र धडकेमुळे कारचे टायर फुटल्याने वाहन पुढे जाऊ शकले नाही. त्यानंतर कारमधील सर्वजण गाडी जागीच सोडून पसार झाले. दरम्यान, अपघातग्रस्त वाहन जप्त करण्यात आले असून पसार झालेल्या कारचालकाचा शोध पोलीस करत आहे.
याप्रकरणी सुनील नवनाथ राठोड राहणार कुंभारी पिंपळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम.एच.१४ जेई ५६४२ या कारच्या चालकाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या आदेशान्वये पोउनि किशन पतंगे करत आहेत या तपासकामी माने, शे.मुखीद हे सहकार्य करत आहेत.