Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी वृद्ध मृतदेह

परभणीत अनोळखी वृद्ध इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन

Parbhani Dead Body: परभणीतील गंगाखेड पोलीस ठाण्यासमोर मृतावस्थेत आढळलेल्या 65 वर्षीय वृद्ध इसमाची ओळख पटविण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.


परभणीत अनोळखी वृद्ध इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन

Parbhani Dead Body |

परभणी/गंगाखेड (Parbhani Dead Body) : पोलीस ठाण्यासमोरील चौकात असलेल्या एका हॉटेलसमोर मृतावस्थेत आढळलेल्या एका ६५ वर्षीय वयोवृद्ध इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन गंगाखेड पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी गंगाखेड पोलीस ठाण्यासमोरील चौकात असलेल्या एका शनिवार २ मे रोजी दुपारी हॉटेलसमोर अंदाजे १:३० वाजेच्या सुमारास ६५ वर्षीय अनोळखी वयोवृद्ध इसम मृत अवस्थेत पडलेला आढळून आला असल्याची माहिती मिळताच सपोनि राम गिते, पोह संदीप जाधव, पो. शि. राजु परसोडे आदींनी त्या इसमास १०८ च्या रुग्णवाहिकेतून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात हलविले. (Parbhani Dead Body) याप्रकरणी पोह संतोष मोहळे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करत अनोळखी वयोवृद्ध इसमाचा मृतदेह ओळख पटविण्यासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयातील शव गृहात ठेवण्यात आला.

गोरा रंग, पांढरे केस, छातीवर मध्यभागी तीळ, अंगात पांढऱ्या रंगाचे शर्ट, पांढऱ्या निळ्या रंगाची उमा स्टील कंपनी नाव असलेली बनियान, काळी पॅन्ट, लाल रंगाचा करदोडा, हातात घड्याळ उंची अंदाजे १५५ से. मी. या वर्णनाचा इसम आपल्या ओळखीतील असल्यास गंगाखेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, पोह. संतोष मोहळे, पो. शि. परसराम परचेवाड आदींनी केले आहे.

Related to this topic: