Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी घर रेकी प्रकरण

परभणीत पहाटे तीन संशयितांची घरांची रेकी; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल...!

Parbhani house recce case: शहरातील दत्तधाम परिसरातील सत्कार कॉलनी, श्रेयश कॉलनी व शिवरस्ता परिसरात 16 जुलै रोजी पहाटे सुमारे 1.45 वाजता तीन संशयित व्यक्ती फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद


परभणीत पहाटे तीन संशयितांची घरांची रेकी सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Parbhani house recce case |

 

दत्तधाम परिसरातील सत्कार व श्रेयश कॉलनीत भीतीचे वातावरण;
नवा मोंढा पोलिसांकडे माहिती, रात्रगस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी...!

परभणी (Parbhani house recce case) : शहरातील दत्तधाम परिसरातील सत्कार कॉलनी, श्रेयश कॉलनी व शिवरस्ता परिसरात 16 जुलै रोजी पहाटे सुमारे 1.45 वाजता तीन संशयित व्यक्ती फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. संबंधित व्यक्ती घरांची रेकी करत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला असून हा व्हिडिओ सध्या कॉलनी परिसरात आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी संशयितांची वर्दळ वाढत असल्याने घरफोडीची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांनी सतर्क राहण्यास सुरुवात केली आहे.

या (Parbhani house recce case) प्रकरणाची माहिती नवा मोंढा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, दत्तधाम परिसरासह शहरातील संवेदनशील भागात पोलिसांनी रात्रगस्त वाढवावी, संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दत्तधाम परिसरातील वायरल व्हिडिओ प्रकरणाची माहिती नवा मोंढा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना मिळाली असून सीसीटीव्ही फुटेजची पुष्टी सुरू असून, लवकरच व्हिडिओ मधे दिसणारे संशयितांची चोरट्यांची ओळख पटवून कारवाई  करण्यात येणार असल्याचे माहिती पोलिसांनी देशोन्नती ला दिली