Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

वसतिगृह निकृष्ट भोजन

परभणीत गोरगरिबांच्या लेकरांच्या ताटातही घाला...!

Substandard hostel food: भोजन व आरोग्याशी संबंधित गंभीर हलगर्जीपणा, विद्यार्थ्यांच्या ताटात अपुरे व निकृष्ट दर्जाचे अन्न, वरणामध्ये डाळ शोधूनही सापडत नसल्याची स्थिती, ताटात इतर आवश्यक पदार्थही नाही.


परभणीत गोरगरिबांच्या लेकरांच्या ताटातही घाला

Substandard hostel food |

 

अकोलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहात निकृष्ट भोजनाचा धक्कादायक प्रकार;
पालकांची तक्रार, पुरवठादाराला कारणे दाखवा नोटीस...!

परभणी (Substandard hostel food) : जिंतूर तालुक्यातील अकोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय निवासी शाळा वसतिगृहात विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या मेनूनुसार भोजन दिले जात नसल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी धोतरा (ता. सेनगाव) येथील नितीन लाटे यांनी दि. १३ जुलै रोजी वसतिगृहाच्या ग्रहपालांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, त्यानंतर शहरातील काही सुजाण नागरिकांनी वसतिगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या.

सध्या या शाळा वसतिगृहात १३३ विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्या भोजन व आरोग्याशी संबंधित गंभीर हलगर्जीपणा होत असल्याचे पाहणीत निदर्शनास आले. शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना पौष्टिक व सकस आहार देणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या ताटात अपुरे व निकृष्ट दर्जाचे अन्न वाढले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.तक्रारीनुसार, शासनाच्या मेनूमध्ये असलेले चिकन, मटण, अंडी, तूप यांसारखे पौष्टिक पदार्थ नियमितपणे दिले जात नसून, पुरवठादाराकडून मनमानी पद्धतीने भोजन पुरवले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांचा प्रत्यक्ष पाहणीदरम्यान दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना दोन भाज्या, चपाती, वरण, भात, पापड, कांदा, लिंबू, गाजर व काकडी देणे नियमाने आवश्यक असतानाही केवळ एकच भाजी वाढण्यात आली. (Substandard hostel food) वरणामध्ये डाळ शोधूनही सापडत नसल्याची स्थिती होती. ताटात इतर आवश्यक पदार्थही नसल्याचे पाहणीत दिसून आले. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे नागरिकांनी सांगितले.याचवेळी स्वयंपाकघराची पाहणी केली असता तेथे अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याचे दिसून आले. स्वयंपाकघरात घाण साचलेली होती. तसेच सडलेला व खराब झालेला भाजीपाला आढळून आला. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी फिल्टर केलेले पाणी उपलब्ध नसून दूषित पाणी दिले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ही बाब विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

या (Substandard hostel food) गंभीर तक्रारीची दखल घेत ग्रहपालांनी भोजन पुरवठादार 'डी. एम. एंटरप्राइजेस' यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून,तातडीने खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, शासनाकडून विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात असताना प्रत्यक्षात गोरगरिबांच्या मुलांच्या ताटात निकृष्ट व अपुरे अन्न वाढले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी असा खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, पुरवठादाराचा करार रद्द करावा आणि संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांसह नागरिकांनी केली आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या वसतिगृहातच त्यांच्या आरोग्याशी तडजोड होत असेल, तर ही केवळ प्रशासनाची निष्काळजीपणा नसून सामाजिक न्यायाच्या संकल्पनेलाच काळीमा फासणारी बाब असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. आता या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी कोणती ठोस कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पालकाची तक्रार प्राप्त होताच 
तातडीने पुरवठादार कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली असून येत्या आठ दिवसात दर्जेदार व नियमानुसार जेवण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत
-ग्रहपाल विजय परभणीकर

अनुसूचित जातीच्या मुलांसाठी चालवली जाणारी शासकीय निवासी शाळा हा असंख्य गोर गरीब पालकांचा आधार आहे, शाळेत जर नित्कृष्ट दर्जाचे अन्न आणि इतर भौतिक सुविधा दिल्या जात नसतील तर शाळेला आलेला पैसा जातो कुठे? याची देखील विभागीय चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे.
-बाळासाहेब काजळे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष

Related to this topic: